esakal | CBIच्या माजी संचालकांची आत्महत्या; गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
sakal

बोलून बातमी शोधा

ashwani kumar

मणिपूर आणि नागालँडचे माजी राज्यपाल आणि सीबीआयचे माजी संचालक अश्वनी कुमार त्यांच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

CBIच्या माजी संचालकांची आत्महत्या; गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिमला - मणिपूर आणि नागालँडचे माजी राज्यपाल आणि सीबीआयचे माजी संचालक अश्वनी कुमार त्यांच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. शिमल्याचे पोलिस अधीक्षक मोहित चावला यांनी याबाबत माहिती दिली आहे. अश्वनी यांनी आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात सांगितलं जात आहे. मात्र त्यामागचे कारण अद्याप समजू शकेललं नाही. 

हिमाचलमधील सिरमौर इथले असलेले अश्वनी कुमार हे 1973 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. हिमाचलचे पोलिस महासंचालक, सीबीआयचे प्रमुख यासह अनेक पदं त्यांनी भूषवली. त्यांच्या आत्महत्येच्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. 

अश्वनी कुमार यांना 2006 मध्ये हिमाचलच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्त करण्यात आलं होतं. त्यांनी हिमाचल प्रदेशमध्ये अनेक सुधारणा केल्या. सुरुवातीला डिजिटलीकरण, पोलिस ठाण्यांमध्ये संगणकाच्या वापराला त्यांनी सुरुवात केली होती. तसंच तक्रारींच्या ऑनलाइन नोंदणीची व्यवस्था तयार केली. त्यामुळे दुर्गम भागातील लोकांना पोलिस ठाण्यात येण्यासाठी करावी लागणारी धावपळ थांबली. 

जुलै 2008 मध्ये अश्वनीकुमार सीबीआयचे संचालक बनले. या पदावर नियुक्त झालेले ते हिमाचल प्रदेशातील पहिले पोलिस अधिकारी होते. 2013 मध्ये युपीए सरकारने त्यांना नागालँडचे राज्यपाल बनवले. त्यानंतर जुलै 2013 मध्ये त्यांच्याकडे मणिपूरचे राज्यपालपद सोपवण्यात आलं.