
भारताचे माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील बेंचने दिलेला निर्णय सिंगापूरमध्ये फेटाळून लावण्यात आला आहे. सिंगापूरच्या सर्वोच्च न्यायालयानेही यावर शिक्कामोर्तब केलंय. सिंगापूर सर्वोच्च न्यायालायने म्हटलं की, न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील निर्णय फेटाळून लावणं योग्य आहे. कारण त्यांनी दिलेल्या निर्णयातील तपशील हा मोठ्या प्रमाणावर कॉपी-पेस्ट होता. न्यायालयाने म्हटलं की, निर्णयात ४५१ पॅरेग्राफ होते. त्यातील २१२ पॅरेग्राफ हे मागच्याच निर्णयातील आहे तसे घेण्यात आले होते. हे निर्णय न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या पीठाने सुनावले होते. त्यांच्या दोन प्रकरणात लिहिलेला कंटेंट इथं कॉपी पेस्ट केला होता असंही सिंगापूर कोर्टाने नमूद केलं.