कॉलेजियमच्या निर्णयांवरून माजी न्यायमूर्ती आमनेसामने; जस्टीस कौल यांच्या आरोपाला चंद्रचूड यांनी दिलं प्रत्युत्तर, काय म्हणाले?

Justice Kaul's Allegations Against DY Chandrachud : आपल्या आगामी ‘विदाउट फिअर ऑर फेवर’ या पुस्तकात कौल यांनी चंद्रचूड सरकारच्या बाबतीत गरजेपेक्षा अधिक नरम भूमिका घेत असल्याचा आरोप केला आहे.
Justice Kaul's Allegations Against DY Chandrachud

Justice Kaul's Allegations Against DY Chandrachud

esakal

Updated on: 

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्त्या आणि कॉलेजियमच्या कामकाजावरून देशातील दोन माजी न्यायमूर्तींमध्ये मतभेद समोर आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती संजय किशन कौल यांनी माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आपल्या आगामी ‘विदाउट फिअर ऑर फेवर’ या पुस्तकात कौल यांनी चंद्रचूड सरकारच्या बाबतीत गरजेपेक्षा अधिक नरम भूमिका घेत असल्याचा आरोप केला आहे. या आरोपांना आता चंद्रचूड यांनी उत्तर दिलं असून, त्यांच्या कार्यकाळात कॉलेजियमचे सर्व निर्णय सर्वसंमतीने घेतले गेल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com