Loksabha 2019 : 'त्या' प्रश्नावर माजी मुख्यमंत्र्यांनी लगावली श्रीमुखात

वृत्तसंस्था
सोमवार, 6 मे 2019

विकासाच्या मुद्यावरून विधानसभेमध्ये निवडून गेलेल्या उमेदवाराने काय काम केले? व तुम्ही या भागाच्या विकासासाठी काय केले? हे विचारण्याचा प्रयत्न केला.

संगरूर (पंजाब) : विकासाच्या मुद्यावर विचारलेल्या प्रश्नावर चिडून माजी मुख्यमंत्री राजिंदर कौर भट्ठल यांनी एका युवकाच्या श्रीमुखात लगावली. यानंतर कार्यकर्त्यांनीसुद्धा त्या तरुणाला फरपटत दुसऱ्या नेऊन बेदम मारहाण केली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री राजिंदर कौर भट्ठल (वय 73) या पंजाबच्या पहिल्याच महिला मुख्यमंत्री होत्या. 1992 ते 2017 पर्यंत त्या आमदार होत्या. 2017 मध्ये त्या पराभूत झाल्या होत्या. राजिंदर कौर या काँग्रेसचे उमेदवार केवल सिंह ढिल्लों यांच्या प्रचारासाठी रविवारी (ता. 5) बुशैहरा गावात आल्या होत्या. यावेळी एका युवकाने विकासाच्या मुद्यावरून विधानसभेमध्ये निवडून गेलेल्या उमेदवाराने काय काम केले? व तुम्ही या भागाच्या विकासासाठी काय केले? हे विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गप्प बसविले. युवकाने पुन्हा तोच प्रश्न विचारताच राजिंदर कौर यांचा पारा चढला आणि त्यांनी थेट त्या युवकाच्या श्रीमुखात लगावली व प्रचारसभेतून बाहेर पडल्या.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी कुलदीपला बाजूला नेल्यानंतर मारहाण केली. यावेळी उपस्थितांनी काँग्रेस उमेदवार, रोजिंदर कौर यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former cm slaps youth for asking tough questions’ at Sangrur rally at punjab