Manish Sisodia : आजारी पत्नीला भेटण्यासाठी सिसोदियांना सहा तासांची मुदत; दिल्ली पोलिसांच्या कडक पाहाऱ्यात पोहचले घरी

former Delhi Dy CM Manish Sisodia to meet his ailing wife as allowed by Rouse Avenue court
former Delhi Dy CM Manish Sisodia to meet his ailing wife as allowed by Rouse Avenue court

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना राऊज एव्हेन्यू कोर्टाने दिवाळीनिमित्त आजारी पत्नीला भेटण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर दिल्ली पोलिस शनिवारी कडक बंदोबस्तात त्यांना त्यांच्या घरी घेऊन गेल्याचे पाहायला मिळाले. सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत सहा तास पत्नीला भेटण्याची परवानगी कोर्टाने दिली आहे. दिल्ली सरकारने आतिशी यांना अधिकृतरित्या दिलेल्या या घरात सिसोदिया आपल्या पत्नीला भेटत आहेत. हेच सरकारी निवासस्थान यापूर्वी तत्कालीन मंत्री सिसोदिया यांना देण्यात आले होते.

उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना त्यांच्या आजारी पत्नीला भेटण्यासाठी सहा तासांची परवानगी देण्यात आली आहे. या भेटीदरम्यान ते पोलिस कोठडीतच राहणार आहेत. विशेष न्यायाधीश एम. के. नागपाल यांनी शनिवारी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत पोलिस कोठडीत सिसोदिया यांना त्यांच्या घरी आजारी पत्नीला भेटण्याची परवानगी दिली. त्याने आजारी पत्नीला पाच दिवस भेटण्याची परवानगी मागितली होती.

former Delhi Dy CM Manish Sisodia to meet his ailing wife as allowed by Rouse Avenue court
Uddhav Thackeray : शाखा जमीनदोस्त केल्याचा वाद चिघळणार? मुंब्रा-ठाण्यात ठाकरेंच्या स्वागताचे होर्डिंग्ज फाडले

कोर्टाने यापूर्वी सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी २२ नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आली होती. सीबीआय-ईडी यांनी सिसोदिया यांच्या मागणील विरोध दर्शवला होता. त्यांनी आरोपी कोणत्या कायद्याअंतर्गत परवानगी मागत आहेत असा प्रश्न विचारला. आरोपीकडून अंतरिम जामीनासाठी अर्ज करण्यात आला पाहिजे होता. यापूर्वी जून मध्ये पत्नी गंभीररित्या आजारी पडल्याने एलएनजेपी मध्ये भरती करणअयात आले होते. तेव्हा सिसोदिया यांनी पत्नीची भेट घेण्याची मागणी मागितली होती, जी कोर्टाने मान्य केली होती.

former Delhi Dy CM Manish Sisodia to meet his ailing wife as allowed by Rouse Avenue court
Maratha Reservation: मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील आणि तानाजी सावंतांमध्ये जुंपली!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com