UP Election 2022: ईडीचे माजी सहसंचालक निवडणुकीच्या रिंगणात; भाजपने दिले तिकीट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajeshwar Singh

ईडीचे माजी सहसंचालक निवडणुकीच्या रिंगणात; भाजपने दिले तिकीट

सध्या देशात पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. यामध्ये उत्तर प्रदेशची निवडणुक सर्वात महत्त्वाची मानली जात आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीविषयी विशेष बाब म्हणजे ईडीचे माजी सहसंचालक राजेश्वर सिंग (Rajeshwar Singh) भाजपाच्या तिकिटावर निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. यावरून संपुर्ण देशात चर्चा रंगली आहे. यावरुन महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातुनही ईडी आणि भाजपचा घनिष्ट संबंध असल्याची टिका करण्यात आली आहे.

‘भाजपात असु तर ईडीची कारवाई होत नाही, असे म्हणणे बालीशपणाचे विधान आहे’, असे राजेश्वर सिंग यांनी टिकेला उत्तर देताना म्हटले. आरोप करणे विरोधकांचे काम आहे, असेही ते म्हणाले. लखनऊमध्ये कार्यरत असलेल्या राजेश्वर सिंह यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हा अर्ज केला होता. राजेश्वर सिंह आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहे.

हेही वाचा: प्रियकरानं पत्नीलासोबत घेऊन प्रेयसीचा काढला काटा

ईडीचे माजी सहसंचालक राजेश्वर सिंग यांनी २-जी प्रकरण आणि चिदंबरम प्रकरणात चौकशी अधिकारी म्हणुन महत्त्वाची भुमिका बजावली होती. कॉमनवेल्थ गेम्स, टूजी स्पेक्ट्रम आणि कोळसा घोटाळा आणि सहाराचे प्रमुख सुब्रत रॉय यांसारख्या प्रकरणांच्या तपासातही राजेश्वर सिंह यांचा सहभाग आहे. राजेश्वर सिंह यांच्यावरही बेहिशोबी मालमत्तेचेही आरोप होते. या आरोपांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीही झाली.

Web Title: Former Ed Joint Director Rajeshwar Singh Fight Up Polls On Bjp Ticket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..