

Swaraj Kaushal Passed Away
ESakal
ज्येष्ठ वकील आणि मिझोरमचे माजी राज्यपाल स्वराज कौशल यांचे निधन झाले आहे. माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे पती आणि भाजप खासदार बांसुरी स्वराज यांचे वडील स्वराज कौशल यांचे गुरुवारी वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी ४ डिसेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. दिल्ली भाजपने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून स्वराज कौशल यांच्या निधनाची माहिती दिली.