वीजप्रश्नी बाळासाहेब मुरकुटे आक्रमक; महावितरण कार्यालयामध्येच गळफासाचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरण

वीजप्रश्नी बाळासाहेब मुरकुटे आक्रमक; महावितरण कार्यालयामध्येच गळफासाचा प्रयत्न

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अहमदनगर: माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी शेतकऱ्यांचा वीजतोड प्रकरणी गळफास घेण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना लक्षात येताच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना रोखलं आहे. सध्या नेवासा तालुक्यात महावितरण कर्मचाऱ्यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज कट केली जात आहे. याबाबत नेवासा तालुका भाजप आक्रमक झाले आहे.

हेही वाचा: मुंबई NCB ची नांंदेडमध्ये धडक कारवाई; ड्रग्ज प्रकरणात तिघांना अटक

वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातच वीज प्रश्नाबाबत भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली नेवासा भाजपचे पदाधिकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. नेवासा भाजपचे शिष्टमंडळ यांनी शेतकऱ्याकडून पाच हजार रुपये न घेता तीन हजार रुपये भरून घ्यावेत, ही मागणी केली होती. मात्र यावेळी अधिकाऱ्यांनी या मागणीला केराची टोपली दाखवली. त्यामुळे संतप्त झालेल्या मुरकुटे यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातच गळफास घेण्याचा प्रयत्न केला.

या प्रश्नी गेल्या तीन तासापासून ठिय्या आंदोलन सुरू होते. आधिकाऱ्यांनी मागण्या मान्य न केल्याने संतप्त आमदार मुरकुटे यांनी गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा श्वास रोखल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

loading image
go to top