

Prajwal Revanna
बलात्कार प्रकरणी बंगळुरू मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला माजी खासदार प्रज्वल रेवन्नाच्या हाय सिक्युरीटी सेलमध्ये मोबाईल फोन आणि पेन ड्राइव्ह जप्त केले होते. पोलिसांनी या दोन्हींची फॉरेन्सिक चाचणी केली असता धक्कादायक माहिती समोर आलीय. मोबाईल फोन आणि पेन ड्राइव्हमध्ये पॉर्न व्हिडीओ सेव्ह होते. तुरुंगातून बाहेरच्या लोकांशी संवाद साधल्याचं रेकॉर्डिंगही आढळून आलंय.