अटलबिहारी वाजपेयींच्या कारकिर्दीचा आढावा

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

कवितासंग्रह 
- ट्‌वेन्टीवन पोएम्स (2003) 
- क्‍या खोया, क्‍या पाया ः अटलबिहारी वाजपेयी, व्यक्तीत्व और कविताएँ (हिंदी आवृत्ती) (1999) 
- मेरी इक्‍यावन कविताएँ (1995) 
- श्रेष्ठ कविता (1997) 
- अल्बम 
- नयी दिशा - जगजितसिंह यांच्यासोबत अल्बम (1999) 
- संवेदना - जगजितसिंह यांच्यासोबत अल्बम (2002) 

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (वय ९३) यांचे आज (गुरुवार) सकाळी एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांना गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालविली. 

वाजपेयी यांच्या कारकिर्दीवर थोडक्यात आढावा : 

वाजपेयींना मिळालेले पुरस्कार :
- 1992 - पद्मविभूषण 
- 1993 - कानपूर विद्यापिठाची मानद डॉक्‍टरेट 
- 1994 - लोकमान्य टिळक पुरस्कार 
- 1994 - सर्वोत्कृष्ट संसदपटू 
- 1994 - भारतरत्न पंडीत गोविंद वल्लभ पंत पुरस्कार 
- 2015 - भारतरत्न किताबाने सन्मानीत 
- 2015 - बांगलादेश मुक्तीयुद्ध सन्मान 

वाजपेयी यांची वाङ्‌मयसंपदा आणि ग्रंथनिर्मिती 
- नयी चुनौती, नया अवसर (हिंदी आवृत्ती), 2002 
- इंडियाज्‌ पर्स्पेक्‍टिव्ह ऑन एशियान अँड एशिया- पॅसिफिक रिजन (2003) 
- न्यू डायमेन्शन्स ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी (1979) 
- डिसीशिव्हज्‌ डेज्‌ (1999) 
- व्हेन वुईल ऍट्रोसिटिज ऑन हरीजन स्टॉप ः अटल बिहारी वाजपेयी यांचे राज्यसभेतील भाषण (1988) 
- हिल द वुन्ड ः वाजपेयीज अपिल ऑन आसाम ट्रॅजिडी टू पार्लमेंट (1983) 
- नॅशनल इंटिग्रेशन (1961) 
- शक्ती से शांती (1999) 
- राजनिती की रपतिली रहेम (1997) 
- विकारा बिंदू (हिंदी आवृत्ती) (1997) 
- कुछ लेख, कुछ भाषण (1996) 
- बॅक टू स्क्वेअर (1998) 
- डायनॅमिक्‍स ऑफ ऍन ओपन सोसायटी (1977) 
- सेक्‍युलरवाद ः भारतीय परंपरा (डॉ. राजेंद्र प्रसाद स्मारक व्याख्यानमाला) (1996) 

कवितासंग्रह 
- ट्‌वेन्टीवन पोएम्स (2003) 
- क्‍या खोया, क्‍या पाया ः अटलबिहारी वाजपेयी, व्यक्तीत्व और कविताएँ (हिंदी आवृत्ती) (1999) 
- मेरी इक्‍यावन कविताएँ (1995) 
- श्रेष्ठ कविता (1997) 

अल्बम 
- नयी दिशा - जगजितसिंह यांच्यासोबत अल्बम (1999) 
- संवेदना - जगजितसिंह यांच्यासोबत अल्बम (2002) 

अटलबिहारी वाजपेयींच्या सार्वजनिक जीवनाची वाटचाल 
- 1951 - संस्थापक सदस्य भारतीय जनसंघ (बी. जे. एस.) 
- 1957 - दुसऱ्या लोकसभेवर निवड 
- 1957 -77 - भारतीय जनसंघाच्या संसदीय पक्षाचे नेते 
- 1962 - राज्यसभा सदस्य 
- 1966- 67 - सरकारच्या ऍश्‍युरन्स कमिटीचे अध्यक्ष 
- 1967 - चौथ्या लोकसभेवर फेरनिवड (दुसऱ्यांदा) 
- 1967 - 70 - अध्यक्ष, सार्वजनिक लोकलेखा समिती 
- 1971 - पाचव्या लोकसभेवर फेरनिवड (तिसऱ्यांदा) 
- 1977 - सहाव्या लोकसभेवर फेरनिवड (चौथ्यांदा) 
- 1977 - 79 - केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री 
- 1977 - 80 - संस्थापक सदस्य जनता पक्ष 
- 1980 - सातव्या लोकसभेवर फेरनिवड (पाचव्यांदा) 
- 1980 - 86 - अध्यक्ष, भारतीय जनता पक्ष 
- 1980- 84, 1986 आणि 1993- 96 - भाजपच्या संसदीय पक्षाचे नेते 
- 1986 - राज्यसभा सदस्य, जनरल पर्पज कमिटीचे सदस्य 
- 1988 - 90 - हाऊस कमिटी आणि बिझनेस ऍडव्हायजरी कमिटी यांचे सदस्य 
- 1990 -91 - अध्यक्ष, पिटीशन्स कमिटी 
- 1991 - दहाव्या लोकसभेवर फेरनिवड (सहाव्यांदा) 
- 1991 -93 - अध्यक्ष, सार्वजनिक लोकलेखा समिती 
- 1993 -96 - लोकसभेतील विरोधी पक्ष नेते; अध्यक्ष, परराष्ट्र व्यवहार समिती 
- 1996 - अकराव्या लोकसभेवर फेरनिवड (सातव्यांदा) 
- 16 मे 1996 - 31 मे 1996 - तेरा दिवसांचे पंतप्रधान. या काळात त्यांच्याकडे रसायन आणि खते, सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार, कोळसा, वाणिज्य, दळणवळण, पर्यावरण आणि वने, अन्नप्रक्रिया उद्योग, मानव साधनसंपत्ती विकास, कामगार, खाणी, अपारंपरिक उर्जा स्त्रोत, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, नियोजन आणि कार्यअंमलबजावणी, उर्जा, रेल्वे, ग्रामीण आणि रोजगार, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पोलाद, भूपृष्ठ वाहतूक, वस्त्रोद्योग, जलसंपत्ती, अणू उर्जा, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, जम्मू आणि काश्‍मिर व्यवहार, सागरी विकास, अंतराळ एवढ्या खात्यांचा कार्यभार होता 
- 1996 -97 - लोकसभेतील विरोधी पक्षनेते 
- 1997- 98 - अध्यक्ष, परराष्ट्र व्यवहार समिती 
- 1998 - बाराव्या लोकसभेवर फेरनिवड (आठव्यांदा) 
- 1998- 99 - भारताचे पंतप्रधान, परराष्ट्र व्यवहारमंत्री 
- 1999 - तेराव्या लोकसभेवर फेरनिवड (नवव्यांदा) 
- 13 ऑक्‍टोबर 1999 - 13 नोव्हेंबर 2004 - भारताचे पंतप्रधान 

वाजपेयी यांचे प्रमुख परदेश दौरे 
- 1965 - पूर्व आफ्रिकेला संसदेच्या सदिच्छा पथकाद्वारे भेट, 1967 - संसदीय शिष्टमंडळातून ऑस्ट्रेलिया भेट, 1983 - युरोपीय संसद भेट, 1987 - कॅनडा दौरा, 1966 व 1994 - झांबिया दौरा, 1974 - आंतर संसदीय संघटना परिषदेसाठी जपानला भेट, 1975 - श्रीलंका, 1984 - स्विर्त्झलॅंड, 1988, 1990, 1991, 1993 आणि 1994 - भारतीय शिष्टमंडळातून संयुक्त राष्ट्रसंघाच्या जनरल असेंब्लीत सहभाग, 1993 - जिनिव्हा येथील मानवी हक्क आयोगाच्या परिषदेस हजेरी. 

अशा होत्या वाजपेयींच्या आवडीनिवडी 
- जीवनध्येय - जीवनात वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या व्यवस्थीत पार पाडणे आणि भारत महान राष्ट्र झाल्याचे पाहणे 
- दुःखद घटना - वडिलांचे निधन 
- जवळचे मित्र - लालकृष्ण अडवानी, भैरोवसिंह शेखावत, एन. एम. घटाटे, जसवंतसिंह, डॉ. मुकूंद मोदी 
- आवडता पोषाख - धोतर, कुडता, क्वचीत पठाणी सूट 
- आवडता रंग - निळा 
- आवडते ठिकाण - मनाली, अलमोडा आणि माऊंट अबू 
- आवडते पदार्थ - मासे आणि चायनिज पदार्थ, खिचडी, खिर, मालपुवा 
- दिल्लीतील आवडती खाद्यठिकाणे - पराठेवाली गल्ली, सागर आणि चुगवा 
- आवडते गायक, वाद्ये - पंडीत भिमसेन जोशी, अमजद अली खान आणि हरीप्रसाद चौरसिया 
- आवडते गीत - ""ओ रे माझी...'' सचिन देव बर्मन यांनी म्हटलेले आणि मुकेश-लता मंगेशकर यांनी म्हटलेले ""कभी कभी मेरे दिल में'' 
- आवडते गायक - लता मंगेशकर, मुकेश आणि महंमद रफी 
- आवडते चित्रपट (हिंदी) - देवदास, बंदिनी आणि तिसरी कसम 
- आवडते चित्रपट (इंग्रजी) - "ब्रिज ओव्हर रिव्हर कव्वाई' आणि "बॉर्न फ्री' आणि "गांधी' 
- आवडते कवी - सूर्यकांत त्रिपाठी निराला, बालकृष्ण शर्मा नवीन, जगन्नाथ प्रसाद मिलींद सर्व हिंदीमधील आणि उर्दूतील फैज अहमद फैज 
- आवडते क्रीडाप्रकार - हॉकी आणि फूटबॉल 

- अभय सुपेकर, (सकाळ संशोधन आणि विकास विभाग) 

Web Title: Former PM Atal Bihari Vajpayee life