
डॉ. मनमोहन सिंग हे भारतीय राजकारणातील एक अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व होते. 1991 मध्ये, जेव्हा देश गंभीर आर्थिक संकटात होता, तेव्हा त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला सुधारण्यासाठी क्रांतिकारी धोरणे आणली. त्यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी ब्रिटिश भारतातील पंजाबमध्ये झाला होता. आज त्यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. गुरुवारी रात्री दिल्लीच्या एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्ली एम्सने अधिकृत निवेदन जारी करून याची पुष्टी केली आहे.
विभाजनानंतर डॉ. मनमोहन सिंग यांचे कुटुंब भारतात आले. शिक्षणक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठ, कॅम्ब्रिज, आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून उच्च शिक्षण घेतले.