माजी पंतप्रधान राजीव गांधींची जयंती; PM मोदींनी केलं ट्विट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी पंतप्रधान राजीव गांधींची जयंती; PM मोदींनी केलं ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीव गांधींना जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे.

माजी पंतप्रधान राजीव गांधींची जयंती; PM मोदींनी केलं ट्विट

नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज जयंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीव गांधींना जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून श्रद्धांजली वाहताना म्हटलं की,'देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम.'

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीव गांधींना अभिवादन केलं. राजघाटावर असलेल्या वीरभूमी इथं राहुल गांधींनी राजीव गांधींच्या समाधी स्थळी जाऊन श्रद्धांजली वाहिली. राहुल गांधी यांनी फेसबुकवर एक पोस्टही केली आहे. यात म्हटलं की,'एक धर्मनिरपेक्ष भारतच एक असा भारत आहे जो जिवंत राहू शकतो. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.'

हेही वाचा: रवींद्रनाथ टागोर यांचा रंग सावळा; केंद्रीय मंत्र्याचे वादग्रस्त विधान

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून कऱण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान, 21 व्या शतकातील भारताचे शिल्पकार, दूरदृष्टीचे नेते, देशभक्त, भारतरत्न राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहताना आम्ही त्यांच्या अमूल्य योगदानाचे स्मरण करतो.'

हेही वाचा: घनी यांना भारतात आश्रय द्यावा; सुब्रह्मण्यम स्वामी

राजीव गांधी यांनी 1984 ते 1989 या काळात देशाचे पंतप्रधान पद भूषवले होते. 1991 मध्ये निवडणुकीवेळी त्यांची लिट्टेकडून हत्या करण्यात आली होती. राजीव गांधी यांचा जन्मदिन काँग्रेसकडून सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो.

Web Title: Former Pm Rajiv Gandhi Birth Anniversary Pm Modi Tweet Rahul Gandhi On Veer Bhumi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Rajiv Gandhi