परवेज मुशर्रफना अटकेची भीती 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 जून 2018

अटकेच्या भीतीने पाकिस्तानात परतत नसल्याचे पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी म्हटले आहे. मुशर्रफ सध्या दुबईत असून, त्यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून पाकिस्तानातील माध्यमांशी संवाद ते म्हणाले, की मला पाकिस्तानात परतायचे आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मला परतण्याच्या योजनेवर पुनर्विचार करणे भाग पडले. मी भित्रा नाही, हे जगाला ठाऊक आहे. मात्र देशात परतण्यासाठी मी योग्य वेळेची वाट पाहत आहे.

कराची: अटकेच्या भीतीने पाकिस्तानात परतत नसल्याचे पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी म्हटले आहे. मुशर्रफ सध्या दुबईत असून, त्यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून पाकिस्तानातील माध्यमांशी संवाद ते म्हणाले, की मला पाकिस्तानात परतायचे आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मला परतण्याच्या योजनेवर पुनर्विचार करणे भाग पडले. मी भित्रा नाही, हे जगाला ठाऊक आहे. मात्र देशात परतण्यासाठी मी योग्य वेळेची वाट पाहत आहे.

दरम्यान, मुशर्रफ यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाबरोबरच देशातील अन्य उच्च न्यायालयांतही खटले सुरू आहेत. त्यात बेकायदेशीररीत्या देशात आणीबाणी लागू करण्याच्या खटल्याचा समावेश आहे. याशिवाय घटनेची पायमल्ली करणे, माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपप्रकरणी खटला सुरू आहे. या खटल्यांमुळे 18 मार्च 2016 पासून उपचाराच्या नावाखाली मुशर्रफ देशाबाहेर गेले ते आजतागायत परतले नाहीत. परंतु वकिलांच्या मते, मुशर्रफ यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांना पार्किन्सनचा आजार असल्याचे सांगण्यात येते. 

Web Title: Former President General Parvez Musharraf fears arrest on returning to Pakistan