...तर भारताची प्रतिमा बिघडेल : प्रणव मुखर्जी

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 जून 2018

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज (गुरुवार) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात भेट दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाचा समारोप प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत पार पडला.

नागपूर : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज (गुरुवार) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात भेट दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाचा समारोप प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक स्वयंसेवक उपस्थित होते. यावेळी मुखर्जी म्हणाले, ''आम्ही जर तिरस्कार आणि भेदभाव करत आलो तर देशाची ओळख धोक्यात येईल. तसेच भारताची प्रतिमा बिघडेल''. 

मुखर्जी यांनी आपल्या भाषणात विविध मुद्यांवर भाष्य केले. 

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे : 

- आम्ही जर तिरस्कार आणि भेदभाव करत आलो तर देशाची ओळख धोक्यात येईल.

- भेदभाव केला तर भारताची प्रतिमा बदलेल.

- राष्ट्र, राष्ट्रभावना आणि देशभक्तीची संकल्पना सर्वांसमोर मांडणार आहे.

- भारत स्वतंत्र विचारांचा देश, देशासाठी समर्पण हीच खरी देशभक्ती.

- 122 भाषा, 1600 बोली.

-  भारत जागतिक स्तराशी निगडित आहे.

-  भारत स्वतंत्र विचारांचा देश.

- 1800 वर्षांपूर्वी भारत शिक्षणाचे केंद्र होते.

- आज मी याठिकाणी देशभक्तीची संकल्पना आणि राष्ट्रभावना समोर ठेवणार आहे.

- असहिष्णुतेमुळे आपल्या देशाची राष्ट्रीय ओळख धुळीस मिळते.

- राष्ट्रवाद, देशभक्तीवर येथे बोलायला आलो.

- वसुधैव कुटुंबकम हीच भारतीय राष्ट्रवादाची प्रेरणा

-  1800 काळात चाणक्याने अर्थशास्त्र शिकवले.

- विविधेतत एकता हेच देशाचे सौंदर्य.

- देशासाठी समर्पण हीच देशसेवा.

- भारतातूनच जगाने बौद्ध धर्म आत्मसात केला. 

- विविध धर्म, भाषा आणि वर्ण ही भारताची खरी ओळख.

- भारतावर अनेक हल्ले झाले, अनेक राजवटी आल्या.

- हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख मिळून देशाची ओळख पूर्ण होते. 

दरम्यान, प्रणव मुखर्जी यांनी संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी त्यांनी संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे देशाचे महान सुपूत्र होते. त्यांना मी नमन करतो, अशा भावना व्यक्त केल्या. प्रणव मुखर्जी यांना मोहन भागवत यांनी महाल परिसरात असणाऱ्या हेडगेवार यांच्या निवासस्थानाची माहिती दिली. 

Web Title: Former President Pranab Mukherjee addresses Sangh Workers at Nagpur