esakal | Pranab Mukherjee Health Update : प्रणव मुखर्जी यांच्या तब्येतीत सुधारणा
sakal

बोलून बातमी शोधा

former president pranab mukherjee health update condition improving

प्रणव मुखर्जींची प्रकृती बिघडल्यानं त्यांना 10 ऑगस्टला रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी त्यांच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्याने शस्त्रक्रिया झाली होती. त्याआधी त्यांची कोरोनाची चाचणीही घेण्यात आली होती.

Pranab Mukherjee Health Update : प्रणव मुखर्जी यांच्या तब्येतीत सुधारणा

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली :  माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या तब्येतीत आज सुधारणा झाली आहे. मुखर्जी यांच्या आतड्यांना संसर्ग  झाल्याने काल त्यांची प्रकृती खालावली होती. काल जो श्वसनासंबंधी त्रास होत होता तो आज कमी झाला आहे. पण, अजूनही मुखर्जी जीवरक्षक प्रणालीवर असून, तज्ञ डॉक्टारांची टीम त्यांच्यावर लक्ष ठेऊन असल्याची माहिती लष्कराच्या रिसर्च अँड रेफरल रुग्णालयाने दिली आहे. मुखर्जी यांची तब्येत बिघडल्यानं १० ऑगस्टला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून ते जीवरक्षक प्रणालीवर आहेत. रुग्णालयात दाखल झाल्याच्या दिवशीच त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासून ते कोमात आहेत. 

देशभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

प्रणव मुखर्जींची प्रकृती बिघडल्यानं त्यांना 10 ऑगस्टला रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी त्यांच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्याने शस्त्रक्रिया झाली होती. त्याआधी त्यांची कोरोनाची चाचणीही घेण्यात आली होती. मुखर्जींच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. शस्त्रक्रियेनंतर मुखर्जींची प्रकृती नाजूक असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यानच्या काळात मुखर्जींच्या प्रकृतीबाबत अफवाही पसरल्या होत्या. त्याबाबत मुखर्जींच्या कुटुंबियांनी माहिती देताना त्यांची प्रकृती स्थिर असून उपचारांना प्रतिसाद देत असल्याचं सांगितलं होतं.

आणखी वाचा - भारतात कोरोना लशीची चाचणी; पहिल्या दिवशी 100 जणांना टोचणार लस

भारताचे तेरावे राष्ट्रपती म्हणून निवड होण्यापूर्वी मुखर्जी हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. मुखर्जींनी डाँ. मनमोहनसिंग मंत्रीमंडळात संरक्षण, अर्थ, परराष्ट्र व्यवहार अशी महत्त्वाची खाती सांभाळली. लोकसभेतील नेते असतानाच त्यांनी काँग्रेस संसदीय पक्ष आणि काँग्रेस विधीमंडळ पक्षाचा प्रमुख ही पदे सांभाळली. त्यांनी जुलै 2012 ते 2017 पर्यंत राष्ट्रपती पद भूषवले. प्रणव मुखर्जींना 2019 मध्ये भारतरत्न पुरस्कारानेही गौरवण्यात आलं आहे.

loading image
go to top