Republic Day 2024: माजी उपमुख्यमंत्री प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यावेळी झाले बेशुध्द; घटनास्थळी खळबळ

Republic Day 2024: देशभरात प्रजासत्ताक दिनाचा सोहळा उत्साहात पार पडत आहे. या सोहळ्यावेळी अचानक माजी उपमुख्यमंत्री बेशुध्द झाले.
Republic Day 2024
Republic Day 2024Esakal

देशभरात प्रजासत्ताक दिनाचा सोहळा उत्साहात पार पडत आहे. अशातच तेलंगणाचे माजी उपमुख्यमंत्री प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यावेळी बेशुध्द झाल्याची घटना घडली.

तेलंगणाचे माजी उपमुख्यमंत्री महमूद अली आज (शुक्रवारी) सकाळी तेलंगणा भवनात प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यादरम्यान बेशुद्ध झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तेलंगणाचे माजी उपमुख्यमंत्री महमूद अली बेशुद्ध अवस्थेत दिसत आहेत, त्यांच्या सभोवतालचे इतर नेते त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या आरोग्याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यानंतर उपस्थित इतर नेत्यांनी त्यांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com