ममतांना मोठा धक्का! तृणमूलच्या 5 नेत्यांचा भाजप प्रवेश 

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 31 January 2021

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे.

नवी दिल्ली- पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धक्क्यावर धक्के बसताना दिसत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत भेट झाल्यानंतर पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे माजी मंत्री राजीब बॅनर्जी यांच्यासह अन्य काही नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेस सोडली होती. 

टीएमसीचे आमदार प्रबीर घोषाल आणि वैशाली डालमिया तसेच हावडाचे माजी मेअर रतिन चक्रवर्ती एका विशेष विमानाने दिल्लीत पोहोचले. त्यांनतर त्यांनी अमित शहांची भेट घेतली. घोषाल आणि डालमिया यांची काही दिवसांपूर्वीच पक्षातून हक्कालपट्टी करण्यात आली होती. नदिया जिल्ह्यातील राणाघाट पश्चिम विधानसभा तृणमूल काँग्रेसचे माजी आमदार पार्थसारथी चटोपाध्याय आणि अभिनेता रुद्रनील घोष हेही या नेत्यांसोबत होते.

कृषी आंदोलनाचा आज 67 वा दिवस; पंतप्रधान मोदींची आज 'मन कि बात'

भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय आणि राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय दिल्लीमध्ये आले होते. एक दिवसापूर्वी राजीब बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याची चर्चा झाल्याचं सांगितलं होतं. तसेच आपल्याला दिल्लीत बोलावण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं होतं.  

राजीब बॅनर्जी ममता सरकारमध्ये वनमंत्री होते. त्यांनी अमित शहांशी चर्चा केल्यानंतर भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्यासाठी कोलकाता ते दिल्लीसाठी चार्टर्ड प्लेन पाठवण्यात आलं होतं. राजीब यांनी शुक्रवारी आपला राजीनामा दिला होता. त्यांच्यासोबत बालीचे आमदार बैशाली डालमिया, उत्तरपाडाचे आमदार प्रबीर घोषाल, हावडाचे मेअर रतिन चक्रबर्ती आणि माजी आमदार सारथी चॅटर्जी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

सकाळ सन्मान सोहळा: आपत्तीकाळात यंत्रणा लोकांच्या पाठीशी, कोरोना योद्धांचे शरद...

तृणमूल काँग्रेसने यावर प्रतिक्रिया दिली आहे. जे लोक पक्ष सोडून गेले आहेत, त्यांचा जास्त काळचा राजकीय इतिहास राहिला नाही आणि त्यातील अनेकांना ममता बॅनर्जींनी पक्षात घेतलं होतं. भविष्यात तृणमूल काँग्रेस सतर्क राहील, असं तृणमूलचे खासदार आणि पक्ष प्रवक्ता सौगत रॉय म्हणाले आहेत. जर कोणाला जायचं असेल तर आपण काय करु शकतो? आम्ही एक पक्ष आहोत. प्रत्येकाला समाधानी करु शकत नाही, असं तृणमूलचे वरिष्ठ नेता आणि मंत्री सुब्रत मुखर्जी म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former TMC leaders Rajib Banerjee joined BJP amit shah