अमेठीत स्मृती इराणींच्या निकटवर्तीयाची हत्या

वृत्तसंस्था
रविवार, 26 मे 2019

अमेठीच्या पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र सिंह यांची पहाटे तीनच्या सुमारास त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेतले असून, तपास सुरु आहे. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याची शक्यता आहे. 
 
अमेठी : उत्तर प्रदेशातील अमेठीतील बरौलिया गावचे माजी प्रमुख आणि नुकतीच निवड झालेल्या भाजप खासदार स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय सुरेंद्र सिंह यांची अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केली आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा गड असलेल्या अमेठी मतदारसंघात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. अमेठीतून स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव केला होता. आता अमेठीत घडलेल्या या हत्याकांडामुळे खळबळ उडाली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. आज (रविवार) पहाटे सुरेंद्र सिंह यांच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बरौलिया हे गाव माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी दत्तक घेतलेले गाव आहे. स्मृती इराणी यांचे ते निकटवर्तीय होते.

अमेठीच्या पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र सिंह यांची पहाटे तीनच्या सुमारास त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेतले असून, तपास सुरु आहे. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याची शक्यता आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former village head in Amethi who campaigned for Smriti Irani shot dead