

Fortuner Car Completely Crushed in MP Accident
Esakal
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर-झाशी महामार्गावर फॉर्च्युनर कारची ट्रॅक्टरला धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात फॉर्च्युनरमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की अपघातात फॉर्च्युनर कारचा चुराडा झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सर्व मृतदेह बाहेर काढून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.