मुलींची 3 लाखांत विक्री! सतर्क कॅब चालकामुळे मोठं रॅकेट उघड, ४ अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

four arrested in infants child stealing and selling in 3-lakh rupees including one couple

मुलींची 3 लाखांत विक्री! सतर्क कॅब चालकामुळे मोठं रॅकेट उघड, ४ अटकेत

एका कॅब चालकाच्या सावधगीरीमुळे नवजात बालकांची चोरी करून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी 2 महिला आणि त्यांच्या साथीदारांना अटक केली होती. दरम्यान त्यांच्याकडून एक महिने वय असलेल्या दोन नवजात बालकांची (infants) सुटका करण्यात आली. पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता, या प्रकरणात आणखी चार जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी दोघे पती-पत्नि यात सामील असल्याचे समोर आले आहे. (four arrested in infants child stealing and selling in 3-lakh rupees)

फोनमुळे चालकास संशय

त्यापैकी एका महिलेच्या मोबाईलवर फोन आला, बोलताना महिलेने 2 तासात अलवरला पोहोचेल असे सांगीतल. रात्री थांबणार नाही, परत येईल, असे देखील महिला फोनवर म्हणाली. काही वेळाने पुन्हा त्यांच्या मोबाईलवर कॉल आला. कॉलवर महिलेने आम्हाला 3 लाख रुपये हवे असल्याचे सांगितले, तीन लाख फक्त रात्रीच हवेत असे ती म्हणत होती. त्यानंतर कॉल डिस्कनेक्ट झाला. त्यानंतर तिघांनी बोलून अलवरला जायचे नाही असे सांगितले. यामुळे कॅब ड्रायव्हर उमेश यांना याचा संशय आला, त्यांना लक्षात आले की, हे तीघे मुलांना विकायला घेऊन जात असावेत.

हरजिंदर सिंग, सुरेंद्र कौर आणि नेहा अशा नावाने हे तिघे एकमेकांशी बोलत होते. बोलताना ते तिघे त्यांच्या इतर साथीदारांसह मुले चोरत असल्याचे उघड झाले. जिथे चांगले पैसे मिळतात तिथे ते या मुलांना विकत असल्याचे समोर आले. त्यांच्या ताब्यातून जप्त केलेल्या दोन्ही मुली त्यांच्या साथीदारांनी दिल्लीतून चोरून त्यांना दिल्या होत्या. मात्र किंमत कमी मिळत असल्याने त्यांचा सौदा रद्द झाला.

हेही वाचा: Jio युजर्ससाठी UPI ऑटोपे फीचर; आपोआप होईल रीचार्ज, असे करा सेट

नेमके काय घडले?

नाथुपूर गावाजवळील डीएलएफ फेज-3 यू ब्लॉकमधील रहिवासी उमेश लोहिया आपल्या कॅबने दिल्लीहून गुडगावला येत होते. धौला विहिरीजवळ पोहोचल्यावर रस्त्याच्या कडेला मुलांना मांडीवर घेऊन उभ्या असलेल्या दोन महिलांनी कॅब थांबवली. त्याच्यासोबत एक व्यक्ती देखील होती. शंकर चौकापर्यंत गुडगाव सोडायचे ठरवून ते कॅबमध्ये चढले. वाटेत अलवरला जाऊन परत दिल्लीला जायचे ठरले. पण मानेसरहून पुढे जाताना कॅबला परत दिल्लीकडे परत घेण्यास सांगण्यातली.या दरम्यान एक महिला कॉलवर बोलत असताना तीन लाख रात्रीच हवेत, असे सांगत होती. हे ऐकून चालकाला संशय आला.

हेही वाचा: Jio एक वर्षाचा प्रीपेड प्लॅन; दररोज मिळेल 2.5GB डेटा आणि बरंच काही

ड्रायव्हरच्या हुशारीने भंडाफोड

तिघांच्या सांगण्यावरून उमेशने कॅब परत गुडगावच्या दिशेने वळवली, त्याने मला डीएलएफ फेज-३ मोलेसरी रोड मेट्रो स्टेशनवर काही वस्तू घ्यायच्या आहेत, तिथे थोडा वेळ लागेल त्यानंतर मी तुम्हाला दिल्ली येथे सोडेन असे सांगितले. गुडगावला आल्यानंतर त्यांनी डीएलएफ फेज-३ भागात कॅब थांबवली आणि बाजारात गेला. तेथून त्याने तिघांवर नजर ठेवली. त्यानंतर परत येत कॅब थेट डीएलएफ फेज-३ पोलीस ठाण्यात घेऊन गेला. जिथे पोलीस स्टेशनने त्यांना अटक केली.

हेही वाचा: PM मोदींच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत शरद पवार यांनी मांडलं मत; म्हणाले, 'पंतप्रधान ही एक...'

आणखी चौघे अटक

सुरेंद्र कौर (४५) या ट्रान्सपोर्ट नगर, राजस्थानमधील रहिवासी आहे, नेहा (३२), रोहिणी सेक्टर-१६, दिल्ली, आणि हरजिंदर सिंग, ३२ वर्षीय रहिवासी, अलवर, राजस्थान. हे तीघे २०१४ पासून ही मुले चोरी करून विकण्याचे काम करत आहेत.

सोमवारी आरोपींच्या चौकशीच्या आधारे, डीएलएफ फेज-३ पोलिस स्टेशनने दिल्लीतील विविध भागात पुन्हा छापे टाकले. त्यानंतर चौघांना अटक करण्यात आली, पलक, कांचन, सतेंद्र आणि रीना अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यापैकी सतेंद्र आणि रीना हे पती-पत्नी आहेत. त्यांच्यासोबत एक बाळ देखील सापडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. सतेंद्र आणि रीना सांगतात की हे ४ महिन्यांचे बाळ त्यांचे आहे. मात्र हे मूल देखील चोरुन आणले गेले असावे, असा संशय पोलिसांना आहे.

ही टोळी मोठ्या प्रमाणावर कार्यरत असल्याची पोलिसांना खात्री आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांच्या चौकशीत अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे अशी माहिती प्रीतपाल सिंग, एसीपी गुन्हे यांनी दिली.

कॅब चालकास 25 हजारांचे बक्षीस

पोलीस आयुक्तांनी के के राव यांनी या कॅब चालकाचे कौतुक केले. या प्रशंसनीय कार्याबद्दल त्यांनी उमेश लोहिया यांना २५ हजार रुपये रोख पारितोषिक आणि प्रथम श्रेणी प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Crime News
loading image
go to top