यंदा मान्सून चार दिवस आधीच केरळमध्ये दाखल

वृत्तसंस्था
रविवार, 13 मे 2018

नवी दिल्ली : केरळ राज्यात यंदा मान्सून 28 मे ला म्हणजे, चार दिवस आधीच दाखल होण्याचा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तवला आहे. 

नवी दिल्ली : केरळ राज्यात यंदा मान्सून 28 मे ला म्हणजे, चार दिवस आधीच दाखल होण्याचा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तवला आहे. 

येत्या 20 मे पर्यंत अंदमान-निकोबार बेटांवर मान्सूनचे आगमन होईल. त्यानंतर पुढील चार दिवसात श्रीलंकेत पोहचून. बंगाल उपसागराच्या दिशेने मान्सूनचा प्रवास सुरू होईल. साधारण 1 जूनला मान्सून केरळ मध्ये दाखल होतो. परंतु, यंदा चार दिवस आधीच दाखल होणार आहे.
मान्सूनसाठी केरळमधील हवामान अनुकूल असल्यास पुढील आठवडाभरात मान्सून महाराष्ट्रत दाखल होऊ शकतो. यावर्षी देशात सामान्य मान्सूनच्या पावसाचा अंदाज  स्काइमेट आणि भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

Web Title: four days ahead of the monsoon enter in kerala