गुजरात : केमिकल फॅक्ट्रीतील स्फोटात चौघांचा मृत्यू; 11 जण जखमी

मृतांमध्ये एका चार वर्षीय चिमूरडीसह 65 वर्षीय पुरुष आणि 30 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
Life imprisonment for two in Ajmer blast case
Life imprisonment for two in Ajmer blast case
Summary

घटनेनंतर जखमींना त्वरीत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे मकरपुरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक साजिद बलोच यांनी सांगितले.

वडोदरा : गुजरातमधील वडोदरा जीआयडीसी भागात शुक्रवारी एका रासायनिक कारखान्यात बॉयलरच्या शक्तिशाली स्फोटात चार जण ठार झाले आहेत. यामध्ये एका चार वर्षांच्या मुलीचादेखील समावेश आहे. तर 11 जण जखमी झाले आहे. झी न्यूज इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे. मृतांमध्ये एका 65 वर्षीय पुरुषाचा आणि 30 वर्षीय महिलेचा समावेश आहे. दरम्यान, स्फोटाचे नेमके कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जीआयडीसी भागात असणाऱ्या सकाळी 9.30 च्या सुमारास एका रासायनिक कारखान्यातील बॉयलरचा शक्तिशाली स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, यामध्ये एका चार वर्षीय चिमूरडीसह चार जणांचा मृत्यू झाला. तर 11 जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर जखमींना त्वरीत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे मकरपुरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक साजिद बलोच यांनी सांगितले. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींचा मृत्यू एकतर भाजल्यामुळे किंवा काही उडत्या वस्तू आदळल्याने झाला असावा असेबलोट यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com