

New Labour Laws
ESakal
आजपासून नवीन कामगार कायदे लागू झाले. कामगार व्यवस्थेतील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल असल्याचे म्हटले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अधिकृतपणे चार नवीन कामगार संहिता लागू केल्या आहेत. सरकारचा दावा आहे की, हे केवळ कायदेशीर सुधारणा नाही तर भारतातील ४० कोटींहून अधिक कामगारांच्या जीवनात एक ऐतिहासिक क्रांती आहे.