

ZP member death car fire Rajasthan
Esakal
राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात गुरुवारी सकाळी भीषण दुर्घटना घडली. स्कॉर्पिओला आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. बोराडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्रीरामपुरा गावात पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर खळबळ उडालीय. स्कॉर्पिओ गाडीत अचानक आग लागल्यानंतर आत असलेल्या लोकांना बाहेर पडता आलं नाही. सर्वांचा जिवंत होरपळून मृत्यू झाला.