सोपोरमधून जैशच्या चार कार्यकर्त्यांना अटक

पीटीआय
गुरुवार, 28 जून 2018

जम्मू काश्‍मीरच्या सोपोर भागातून सुरक्षा दलांनी जैश ए महंमदच्या चार भूमिगत कार्यकर्त्यांना अटक केली आहे, असे पोलिसांनी आज सांगितले. दहशतवाद्यांच्या या कार्यकर्त्यांबाबत सुरक्षा दलांना माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलांनी संयुक्तपणे कारवाई करीत फळ बाजाराला घेराव घातला आणि या चौघांना अटक केली, असे पोलिस प्रवक्‍त्याने सांगितले.

श्रीनगर : जम्मू काश्‍मीरच्या सोपोर भागातून सुरक्षा दलांनी जैश ए महंमदच्या चार भूमिगत कार्यकर्त्यांना अटक केली आहे, असे पोलिसांनी आज सांगितले. दहशतवाद्यांच्या या कार्यकर्त्यांबाबत सुरक्षा दलांना माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलांनी संयुक्तपणे कारवाई करीत फळ बाजाराला घेराव घातला आणि या चौघांना अटक केली, असे पोलिस प्रवक्‍त्याने सांगितले.

महंमद अयुब माला, फैयाज अहमद वार, जाविद अहमद वार आणि मसूद अहमद वार अशी त्यांची नावे आहेत. या वेळी सुरक्षा दलांनी दोन ग्रेनेड, मॅट्रिक्‍स शीट घटनास्थळावरून जप्त केले. या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे या प्रवक्‍त्याने सांगितले. 

Web Title: Four over ground workers of Jaish e Muhammad arrested in Sopore