Election Result Memes : तीन राज्यांमध्ये मोदींची कमाल अन् सोशल मीडियार मीम्सची धमाल! पाहा व्हायरल मीम्स

Assembly Election Results : दुपारपर्यंत आलेल्या कलांनुसार कोणत्या राज्यात कोण जिंकणार हे स्पष्ट झालं आहे.
Election Result Memes
Election Result MemeseSakal

Assembly Election Result Updates : आज राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. दुपारपर्यंत आलेल्या कलांनुसार कोणत्या राज्यात कोण जिंकणार हे स्पष्ट झालं आहे. यानुसार राजस्थान, एमपी आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये पुन्हा भाजपच सत्तेत येत असल्याची चिन्हं दिसत आहेत.

एकीकडे निकाल येण्यास सुरुवात झालेली असतानाच, दुसरीकडे सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. सोशल मीडिया यूजर्स मीम्सच्या माध्यमातून भाजपचा विजय आणि काँग्रेसचा पराजय या दोन्ही गोष्टींवर व्यक्त होत आहेत. पाहूयात व्हायरल होत असलेले काही मीम्स..

काँग्रेसच्या पराभवाची चर्चा..

भाजपची बल्ले-बल्ले..

दरम्यान, तीन राज्यांमध्ये हरलेल्या काँग्रेसला तेलंगणाने मात्र चांगला दिलासा दिला आहे. तेलंगणामध्ये गेली दोन टर्म सत्तेत असणाऱ्या बीआरएस पक्षाला दणका देत काँग्रेस विजयाच्या मार्गावर आहे. याठिकाणी भाजपनेही चांगली कामगिरी केली आहे. गेल्या निवडणुकांना केवळ एका जागेवर जिंकलेलं भाजप सध्या याठिकाणी 7 ते 8 जागांवर पुढे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com