जम्मू-काश्मिरच्या शोपियाँमध्ये चकमक; चार दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मिरच्या शोपियाँमध्ये चकमक; चार दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या शोपियाँ भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज (रविवार) चकमक झाली. यामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. ही चकमक दक्षिण काश्मीरच्या दरमदोरा परिसरात सकाळी घडली. या चकमकीनंतर सध्या परिसरात शोधमोहिम सुरु करण्यात आली.

शोपियाँमध्ये काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे परिसरात शोधमोहीम सुरु करण्यात आली. त्यादरम्यान लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. या गोळीबाराला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर देत चार दहशतवाद्यांना ठार केले. 

दरम्यान, दोन दिवसांपासून सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली होती. त्यानंतर आता शोपियाँमध्ये ही चकमक झाली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com