
श्रीनगर - श्रीनगर येथे रविवारी सकाळी झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सुरक्षा जवान आणि जम्मू काश्मीर पोलिसांना यश आले. आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्याने उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती, अशी माहिती काश्मीर पोलिसांनी दिली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
गेल्या महिन्यात बीएसएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यात या चौघांचाही सहभागी होता. श्रीनगरमधील झदिबल आणि झुनिमर भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय सुरक्षारक्षक जवानांना मिळाली होती. काश्मीर पोलिसांनी सांगितले, की एका घरात तीन दहशतवादी लपून बसले होते. त्यानंतर जम्मू काश्मीर पोलिस आणि भारतीय सुरक्षा जवानांनी संयुक्तरीत्या त्या घराला घेराव घातला. या भागातील इंटरनेट सेवा तत्काळ बंद करण्यात आली. त्यानंतर शोधमोहीम राबविण्यात आली. या वेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केला. दोघांमध्ये मोठी चकमक उडाली. त्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर देण्यात आले. यात चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. शुक्रवारी (ता. 19) आठ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
आई-वडिलांचे आवाहन झुगारले
सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे दहशतवाद्यांची ओळख पटली आणि त्यानंतर त्यांच्या आई-वडिलांना बोलावण्यात आले. त्यांचे आई-वडील दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगत होते; मात्र त्यांच्यावर कोणताही परिणाम झाला नाही. या वेळी दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरवात केली. या चार दहशतवाद्यांपैकी दोघे दहशतवादी 2019 पासून सक्रिय आहेत आणि गेल्या महिन्यात बीएसएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यात सहभागी होता. दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देत भारतीय सैन्याने गेलेल्या गोळीबारात चार दहशतवाद्यांचा खात्मा झाला.
देशच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पूँच, कठुआ भागात पाकिस्तानकडून गोळीबार
पाकिस्तानी सैन्याने रविवारी सकाळी जम्मू-काश्मीरमधील पूँच आणि कठुआ जिल्ह्यातील सीमा नियंत्रण रेषेवर उखळी तोफांचा मारा आणि गोळीबार केला. या वेळी सीमेलगतच्या गावांना लक्ष्य करण्यात आले. पूँच जिल्ह्याच्या बालाकोट भागातील सीमारेषेवर रविवारी सकाळी सव्वा सहा वाजता पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युतर दिले. तसेच कठुआ जिल्ह्यातील हिरानगर भागातील सीमारेषेवरही गोळबार करण्यात आला. उशिरापर्यंत यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळाली नसल्याचे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले.
प्रमुख चार दहशतवाद्यांचा खात्मा
भारतीय लष्कराने गेल्या चार महिन्यांत केलेल्या कारवाई लष्करे तैयबा, जैश-ए- महंमद, हिज्बुल मुजाहिद्दीन, अन्सार गाजवत उल हिंद या चार दहशतवादी संघटनांच्या प्रमुख मोहक्यांना कंठस्नान घातले आहे, अशी माहिती काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजयकुमार यांनी रविवारी दिली. गेल्या दोन आठवड्यांत दहा दहशतवाद्याचे कंबरडे मोडण्यात आले आहे. यात सुरक्षा जवानांची कामगिरीची मोलाची ठरली, असेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.