पुणे जिल्ह्यातील चार हजार होमगार्डवर येणार उपासमारीची वेळ?

मिलिंद संगई
Monday, 13 January 2020

निधीची अडचण असल्याने पुणे जिल्ह्यातील चार हजारांवर होमगार्डवर (गृहरक्षक दलाचे जवान) उपासमारीची वेळ येणार आहे. राज्याकडे निधीची कमतरता असल्याने होमगार्डची सेवा घेण्याचे तत्काळ थांबविण्याचे आदेश पोलिस विभागाला दिले गेल्याने कालपासूनच होमगार्डविना पोलिसांना काम करावे लागत आहे. 

बारामती : निधीची अडचण असल्याने पुणे जिल्ह्यातील चार हजारांवर होमगार्डवर (गृहरक्षक दलाचे जवान) उपासमारीची वेळ येणार आहे. राज्याकडे निधीची कमतरता असल्याने होमगार्डची सेवा घेण्याचे तत्काळ थांबविण्याचे आदेश पोलिस विभागाला दिले गेल्याने कालपासूनच होमगार्डविना पोलिसांना काम करावे लागत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात सगळीकडेच पोलिसांच्या मदतीला बंदोबस्तापासून ते रात्रीच्या गस्तीपर्यंत तसेच तपास कामासह वाहतूकीच्या नियंत्रणासाठीही होमगार्डची मदत व्हायची. होमगार्डला कामाच्या उपलब्धतेनुसार पाचारण केले जायचे. सुधारित नियमावलीनुसार होमगार्डला 670 रुपये प्रतिदिन भत्ताही दिला जात होता. वर्षातील 365 दिवसांपैकी सरासरी 100 ते 110 दिवस त्यांना काम मिळत होते. मध्यंतरी न्यायालयाने या संदर्भात निर्देश देत हे कामाचे दिवस किमान 180 पर्यंत वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या. 

उद्धवजी, राऊताच्या जिभेला लगाम घाला; संभाजीराजे आणि राऊत यांच्यात ट्विटरयुद्ध

मात्र, 10 जानेवारी रोजी एका पत्रान्वये निधी उपलब्ध नसल्याने 50 टक्के कायमस्वरुपी बंदोबस्त स्थगित ठेवण्याची वस्तुस्थिती होमगार्डना समजून सांगत ही सेवा खंडीत करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले. अगोदरच वर्षात पुरेसे दिवस काम मिळत नसल्याने होमगार्ड मेटाकुटीस आले होते, राज्याच्या या नवीन आदेशानुसार आता त्यांच्यावर बेकारीचीच पाळी येणार आहे. पैशांची चणचण भासत असल्याने बेकारीची कु-हाड कोसळणार हे समजल्यावर होमगार्डमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. नाव प्रसिध्द न करण्याच्या अटीवर होमगार्डनी संवाद साधला खरा, मात्र माध्यमांशी बोललो तर शिस्तभंगाची  कारवाई होईल, या भीतीपोटी त्यांनी आपली व्यथा नाव न प्रसिध्द करण्याच्या अटीवर कथन केली. 

मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करणारे जय भगवान गोयल आहेत कोण?

दुसरे कामच करता येत नाही...
होमगार्ड झाल्यावर वर्षात कधीही काम निघू शकते, त्या मुळे इतर कोणती नोकरी करता येत नाही, होमगार्डची सेवा बजावताना इतर कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक जवान याच भत्त्यावर वर्षभर दिवस काढतात. आता तर सेवाच खंडीत झाल्याने अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. 

पोलिसांवरचा ताणही वाढणार...
मदतीला होमगार्ड नसल्याने आजपासूनच पोलिस ठाण्याच्या कामकाजापासून वाहतूकीच्या समन्वयनापर्यंत अनेक ठिकाणी पोलिसांचा ताण वाढल्याचे चित्र दिसले. निवडणूकीच्या कामापासून ते वाहतूक नियंत्रणापर्यंत प्रत्येक ठिकाणी पोलिसांसोबत होमगार्ड काम करतात, त्या मुळे हा निर्णय पोलिसांवरचा ताण वाढविण्यासही कारणीभूत ठरणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four thousand home guards Unemployed in Pune district