विषारी वायूची गळती होऊन चार कामगारांचा मृत्यू

स्मृती सागरिका कानुनगो
Thursday, 7 January 2021

राउरकेला पोलाद प्रकल्पात विषारी वायूची गळती होऊन चार कामगारांचा आज मृत्यू झाला. इतर किमान सहा कामगार आजारी पडले.

‘प्रकल्पातील कोल केमिकल युनिटमध्ये आज सकाळी ही दुर्घटना घडली. त्यावेळी दहा कामगार तेथे काम करत होते. हे सर्वजण कंत्राटी कामगार असल्याचे समजते. ते तेथे दुरुस्तीचे काम करत असतानाच वायुगळती झाली. त्यानंतर सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

भुवनेश्‍वर - राउरकेला पोलाद प्रकल्पात विषारी वायूची गळती होऊन चार कामगारांचा आज मृत्यू झाला. इतर किमान सहा कामगार आजारी पडले.

‘प्रकल्पातील कोल केमिकल युनिटमध्ये आज सकाळी ही दुर्घटना घडली. त्यावेळी दहा कामगार तेथे काम करत होते. हे सर्वजण कंत्राटी कामगार असल्याचे समजते. ते तेथे दुरुस्तीचे काम करत असतानाच वायुगळती झाली. त्यानंतर सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तेथे उपचारा दरम्यान चौघांचा मृत्यू झाला,’ अशी माहिती कंपनीच्या प्रशासनाने दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गणेशचंद्र पालिया (वय ५५), रवींद्र साहू ( ५९), अभिमन्यू साहू (वय ३३) आणि ब्रह्मानंद पांडा (वय ५१) अशी मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत. ‘स्टार कन्स्ट्रक्शन’ कंपनीने या कंत्राटी कामगारांना प्रकल्पात दुरुस्तीच्या कामासाठी आणले होते, असे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. प्राथमिक माहितीनुसार कार्बन मोनॉक्साईड वायूची गळती झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.  या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश कंपनीच्या प्रशासनाने दिले आहेत.

ब्रेकफास्ट अपडेट्सः ट्रम्प समर्थकांचा धुडगूस ते आनंदी पुणेकर; ठळक घडामोडी एका क्लिकवर

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four workers die in poison gas leak

Tags
टॉपिकस
Topic Tags: