ब्रेकफास्ट अपडेट्सः ट्रम्प समर्थकांचा धुडगूस ते आनंदी पुणेकर; ठळक घडामोडी एका क्लिकवर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 January 2021

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर अद्यापही वितंडवाद सुरु आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी व्हाईट हाऊस आणि कॅपिटल बिल्डींगच्या बाहेर जमून मोठा गोंधळ घातला आहे.

1) Breaking News : ट्रम्प समर्थकांकडून US Capitol मध्ये तोडफोड; अभुतपूर्व असा गोंधळ
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर अद्यापही वितंडवाद सुरु आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी व्हाईट हाऊस आणि कॅपिटल बिल्डींगच्या बाहेर जमून मोठा गोंधळ घातला आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा अशी घटना घडली आहे. - सविस्तर वाचा

2) डोनाल्ड ट्रम्प यांचे टि्वट डिलीट; फेसबुक, टि्वटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटही सस्पेंड
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत जो बायडन यांच्या विजयाच्या घोषणेनंतरही विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अजूनही आपला पराभव मान्य करण्यास तयार नाहीत. त्याचे प्रत्यंतर यूएस कॅपिटलमध्ये (संसद) हिंसाचारात झाल्याचे दिसून आले आहे. - सविस्तर वाचा

3) मोदी म्हणतात, वॉशिंग्टनमधील दंगल पाहून अस्वस्थ; लोकशाहीत शांतपणे सत्तेचे हस्तांतरण आवश्यक
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर सुरु असलेला वितंडवाद आज टोकाला गेलेला पहायला मिळाला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी व्हाईट हाऊस आणि कॅपिटल बिल्डींगच्या बाहेर जमून आत घुसून मोठा गोंधळ घातला आहे. - सविस्तर वाचा

4) 'MH-12'चा डंका; आनंदी राहण्यात पुणेकर देशात बाराव्या स्थानी; तर राज्यात एक नंबर!
एमएच 12 म्हणजे की पुणेकर हे समीकरण निश्‍चित झाले आहेत. आता हेच समीकरण राष्ट्रीय पातळीवर देखील आनंदी राहण्यात पुणेकरांनी बारावा नंबर पटकावला आहे. - सविस्तर वाचा

5) भारतीय अर्थव्यवस्था 9.6 टक्क्यांनी घसरणार; वर्ल्ड बँकेने प्रसिद्ध केला अहवाल 
वर्ल्ड बँकेने 2020-21 चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 9.6 टक्क्यांनी घसरणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. - सविस्तर वाचा

6) भारतीय लष्करप्रमुख पोहोचले होते चिनी सैन्याच्या छावणीजवळ; फोटो व्हायरल
संरक्षण मंत्रालयाच्या वार्षिक अहवालानंतर आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याकडून नवीन संरक्षण कायदा जारी करण्यात आल्यानंतर एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. - सविस्तर वाचा

7) Fake TRP | रिपब्लिक विरोधात सबळ पुरावे हाती; मुंबई पोलिसांचे कठोर कारवाईचे संकेत
बनावट टीआरपी प्रकरणी रिपब्लिक टीव्हीविरोधात महत्त्वपूर्ण पुरावे हाती लागल्याचा दावा पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात केला. त्यामुळे येत्या काळात "रिपब्लिक'विरोधात कठोर कारवाई करण्याचे संकेतही पोलिसांनी दिले आहेत. - सविस्तर वाचा

8) मराठा समाजाच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक, कोणते प्रश्न चर्चिले जाणार? जाणून घ्या
मराठा समाजाच्या आरक्षण व त्या अनुषंगाने निर्माण झालेल्या महत्वाच्या विषयांवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज मराठा समाजातल्या नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. - सविस्तर वाचा

9) संजय राऊत आज नाशिकमध्ये; भाजपच्या बड्या नेत्यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल चर्चा शक्य
शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कनेते खासदार संजय राऊत दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. - सविस्तर वाचा

10) सोनं-हिऱ्याची चमकही पडतेय फिकी; किमती ऐकून थक्क व्हाल!
भारत चीनवरील अवलंबित्व पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न करत आहे. यानुसार भारताने अर्जेंटिनाच्या एका कंपनीसोबत लिथियमसंबंधी करार केला आहे. लिथियमचा वापर रिचार्जेबल बॅटरिंमध्ये केला जातो. - सविस्तर वाचा

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Breakfast updates donald trump us captiol violence pune happiest city indian economy army chief mm narwane pm modi fake trp