esakal | चिमुकली रडू लागताच बापाने गिळला अवंढा...
sakal

बोलून बातमी शोधा

four year old girl started crying seeing the ambulance

बापाचे चार वर्षाच्या मुलीवर प्रचंड जीव. पण, रुग्णवाहिका घराजवळ आली आणि चिमुकली जोरजोरात रडू लागली. बाबांचा हात घट्ट धरला. बाबा मला नाही जायचं. पण, बाबांच्याही डोळ्यात अश्रू येऊ लागले. मुलीने घट्ट धरलेला हात वडिलांनी सोडला आणि रुग्णवाहिका तिला घेऊन निघून गेली.

चिमुकली रडू लागताच बापाने गिळला अवंढा...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

भोपाळ : बापाचे चार वर्षाच्या मुलीवर प्रचंड जीव. पण, रुग्णवाहिका घराजवळ आली आणि चिमुकली जोरजोरात रडू लागली. बाबांचा हात घट्ट धरला. बाबा मला नाही जायचं. पण, बाबांच्याही डोळ्यात अश्रू येऊ लागले. मुलीने घट्ट धरलेला हात वडिलांनी सोडला आणि रुग्णवाहिका तिला घेऊन निघून गेली.

माझ्या पण खात्यात लाखो रुपये जमा झाले...

जहांगीराबाद शहरातील ही घटना आहे. येथे एक धोकादायक हॉटस्पॉट असून, दररोज 15 ते 20 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडतात. या भागात आतापर्यंत 180 हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या भागातून दररोज 300 जणांचे सॅपल घेतले जातात. यामध्ये चिमुकलीला लागण झाल्याची माहिती पुढे आली आणि तिला घ्यायला रुग्णवाहिका आली होती.

मालकाने नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतला अन्...

मुलगी रडत असल्याचे पाहून आरोग्य अधिकारी म्हणाला, 'बाळा तू लवकर बरी होशील. तिथे तुला खूप चॉकलेट्स मिळतील. मात्र, तिने बाबांचा हात घट्ट धरून ठेवला होता.' अखेर तिला रुग्णवाहिकेत बसविण्यात आले आणि रुग्णवाहिका निघून गेली. यानंतर सुद्धा कुटुंबियांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते.

loading image
go to top