esakal | माझ्या पण खात्यात लाखो रुपये जमा झाले...
sakal

बोलून बातमी शोधा

rupees started coming into bank account during lockdown at rajasthan

कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, व्यवहार ठप्प झाले आहेत. लॉकडाऊनदरम्यान बॅंकेच्या खात्यात अचानक लाखो रुपये जमा झाल्याचे मेसेज मोबाईलवर आल्यानंतर अनेकांना आनंद झाला. माझ्या खात्यात पैसे जमा झाले, तुमच्या झाले का? अशी चर्चा गावात सुरू झाली आणि प्रकरण पोलिसांपर्यंत गेले.

माझ्या पण खात्यात लाखो रुपये जमा झाले...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

जयपूर (राजस्थान): कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, व्यवहार ठप्प झाले आहेत. लॉकडाऊनदरम्यान बॅंकेच्या खात्यात अचानक लाखो रुपये जमा झाल्याचे मेसेज मोबाईलवर आल्यानंतर अनेकांना आनंद झाला. माझ्या खात्यात पैसे जमा झाले, तुमच्या झाले का? अशी चर्चा गावात सुरू झाली आणि प्रकरण पोलिसांपर्यंत गेले.

पोलिस अधिकाऱयाचा सिंघम स्टाईल व्हिडिओ व्हायरल...

भरतपुर जिल्ह्यातील चिकसाना परिसरातील तीन गावांधील नागरिकांच्या बँक खात्यांमध्ये 2 ते 5 लाखांची रक्कम अचानक जमा होऊ लागली. प्रथम याबद्दल कोणीच बोलत नव्हते. पण, हळूहळू गावामध्ये चर्चा सुरू सुरू झाली. अखेर सायबर क्राईमचा हा प्रकार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चिकसाना परिसरातील तीन गावांमधील नगारिकांच्या खात्यांमध्ये पैसे जमा होऊ लागले. सुरुवातीला त्यांना आनंद वाटू लागला. पण, एवढी मोठी रक्कम पाहून नंतर घाबरू लागले. गावामध्ये हळूहळू चर्चा होऊ लागली. अखेर एकत्रित चर्चा सुरू झाल्यानंतर सर्वांनी मिळून पोलिस चौकी गाठली. चौकशीदरम्यान असे समजले की, नूरपूर गावातील संदीप या युवकाने गावामधील 54 नागरिकांचे एटीएम कार्ड्स गोळा केले होते. त्याने मित्राला नौदलात नोकरी लागण्यासाठी 10 लाख रुपये कुणाला तरी दिले होते. मात्र, नोकरी लागली नाही. आता त्याच्या बहिणीचा विवाह असल्याने त्याला ते पैसे परत घ्यायचे होते. मात्र, लॉकडाऊनमुळे रोख रक्कम घेऊ शकत नसल्याने त्याने अशी शक्कल लढवली आणि विविध खात्यांवर पैसे जमा केले.

मालकाने नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतला अन्...

दरम्यान, संदीप सध्या फरार असून, हा सायबर क्राईमचा प्रकार असल्याचे पोलिसांनी सांगितले. नागरिकांनी आपले बँकेचे डिटेल्स देताना सावध राहावे. संदीपच्या शोध लागल्यानंतर याबद्दलची माहिती पुढे येईल, असेही पोलिसांनी सांगितले.

दारूड्याने सापाला धमकावले अन् तोडले लचके...

loading image
go to top