esakal | मालकाने नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतला अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

employee crushes boss ferrari gt4 lusso with a truck after getting fired

एका कर्मचाऱयाची वागणूक चांगली नसल्यामुळे मालकाने त्याला कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. पण, या निर्णयानंतर त्याने मालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. मालकाच्या तक्रारीनंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

मालकाने नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतला अन्...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

शिकागो: एका कर्मचाऱयाची वागणूक चांगली नसल्यामुळे मालकाने त्याला कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. पण, या निर्णयानंतर त्याने मालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. मालकाच्या तक्रारीनंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

लॉकडाऊन नंतरही ऑफिस नको रे बाबा...

कंपनीमध्ये एकजण चालक म्हणून काम करत होता. पण, त्याचे कामात सातत्य नव्हते. शिवाय वर्तणूक चांगली नसल्यामुळे त्याला कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. कंपनी सोडण्यापूर्वी त्याने मालकाला एका मोटारीकडे इशारा करून विचारले की, ही तुमची फरारी आहे का? यावर मालकाने हो म्हणून उत्तर दिले होते. त्यावर चालकाने तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील म्हणून धमकी दिली आणि निघून गेला. पण, काही वेळानंतर चालक ट्रक घेऊन आला आणि पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या मोटारींवर ट्रक चालवण्यास सुरुवात केली. त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो नुकसान करतच राहिला. त्याने मालकाच्या 5 कोटी रुपयांच्या फेरारीवर ट्रक चढवला आणि चुराडा केला.

कोट्यवधींची संपत्ती पण खांदाही कोणी देईना...

दरम्यान, या घटनेनंतर मालकाने पोलिसांना बोलावून घेतले. काही वेळातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि चालकाला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

loading image