
मणिपूर भूस्खलनात मृत्यू वाढले, 24 जणांचे मृतदेह हाती, अद्याप काहीजण ढिगाऱ्याखालीच
इंफाळ : मणिपूरच्या नोनी जिल्ह्यातील भूस्खलन दुर्घटनेत आतपर्यंत चोवीस जणांचे मृतदेह सापडले आहेत. तसेच १८ जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यात १३ जवान आणि पाच नागरिकांचा समावेश आहे. अन्य मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.
जिरीबाम येथे भारतीय लष्कर, आसाम रायफल्स, मणिपूर पोलिस आणि एनडीआरएफचे पथक कालपासून घटनास्थळी वेगाने काम करत आहेत. पावसामुळे मदतकार्यात अडथळे आले. यावेळी हवाई दलाची देखील मदत घेण्यात आली.
या भूस्खलनात किती जण बेपत्ता झाले आहेत, याचा नेमका आकडा सांगणे कठीण आहे. जिरीबामला इंफाळशी जोडणाऱ्या एका रेल्वे मार्गाचे काम सुरू असून त्यासाठी तुपूल यार्ड येथे १०७ जवानांची नियुक्ती करण्यात आली होती. बुधवारी रात्री तेथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आणि त्यात अनेक जण दबले गेले.
यामुळे गुरुवार सकाळपासूनच मदतकार्याला सुरवात झाली. काल आठ जणांचे मृतदेह सापडले होते आणि त्यानंतर आज सहा जणांचे मृतदेह हाती लागले. मातीच्या ढिगाऱ्याखालून १८ जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आले. या घटनेत एकूण चौदा जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.
Web Title: Fourteen Bodies Found In Manipur Landslide
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..