‘वंदे भारत मिशन’चा  चौथा टप्पा ३ जुलैपासून

वृत्तसंस्था
सोमवार, 29 जून 2020

वंदे भारत मिशनअंतर्गत परदेशातील  भारतीयांना परत आणण्यासाठी चौथा टप्पा ३ जुलैपासून सुरू होणार आहे.  त्याअंतर्गत एअर इंडियाच्या विमांनाची १७ देशांमध्ये १७० उड्डाणे होणार आहेत.  

नवी दिल्ली -  वंदे भारत मिशनअंतर्गत परदेशातील भारतीयांना परत आणण्यासाठी चौथा टप्पा ३ जुलैपासून सुरू होणार आहे. त्याअंतर्गत एअर इंडियाच्या विमांनाची १७ देशांमध्ये १७० उड्डाणे होणार आहेत. हे मिशन ६ मे रोजी सुरू करण्यात आले होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

लॉकडाउनमुळे २३ मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण बंद असल्याने परदेशात अडकलेल्या भारतीयांसाठी हे मिशन सुरू करण्यात आले होते. चौथ्या टप्प्यात अमेरिका, इंग्लंड, केनिया, श्रीलंका, फिलिपिन्स, जपानसह अन्य देशांतून भारतीयांना परत आणले जाणार आहे. भारत-अमेरिका आणि भारत-इंग्लडदरम्यानच्या प्रमासासाठी अनुक्रमे ३२ आणि ३८ विमाने पाठविण्यात येणार आहेत. सौदी अरेबियाला २६ विमाने जाणार आहेत.  नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याबाबत सरकार जुलैच्या शेवटच्या पंधरा दिवसांत विचार करेल. जेव्हा देशांतर्गत विमानसेवा ५० ते ५५ टक्के सुरू होईल, त्यानंतर आंतरराष्ट्रीय सेवांबाबतचा विचार करण्यात येईल. दरम्यान, १५ जुलैनंतर काही निवडक मार्गांवर तत्कालीन परिस्थितीचा अभ्यास करून सेवांना परवानगी दिली जाऊ शकते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fourth phase of Vande Bharat Mission from July 3