Free Liquor Announcement on Temple Loudspeaker in UP
esakal
महाराष्ट्राप्रमाणेच उत्तर प्रदेशातही लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वच इच्छूक उमेदवारांनी तयारी सुरु केली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही उमदेवरांकडून मिठाई तर काहींकडून जेवण दिलं जातं आहे. काहींनी तर चक्क घरोघरी जाऊन जिलेबी वाटली आहे. अशातच एका उमेदवाराने चक्क दारु मोफत देण्याची घोषणा केल्याने आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.