

दिल्ली सरकाने रेशनकार्ड धारकांना दिवाळी आणि होळीला गॅस सिलिंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे. याचा लाभ पीएनजी कनेक्शन धारकांना देखील मिळणार आहे. उत्तर प्रदेशात योगी सरकार आधीपासून या दोन्ही सणाला सिलिंडर मोफत देत आहे. केंद्र सरकारच्या प्रति सिलिंडर ३०० च्या अनुदानात बदल केल्यानंतर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील (पीएम-उज्ज्वला योजना) लाभार्थ्यांना प्रति सिलिंडर ५५३ ची सबसिडी मिळेल. सध्या दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत प्रति सिलिंडर ८५३ रुपये आहे.