esakal | मुलीच्या जन्मानंतर ४० हजार रुपयांच्या पाणीपुरीचे मोफत वाटप
sakal

बोलून बातमी शोधा

daughter

मुलीच्या जन्मानंतर ४० हजार रुपयांच्या पाणीपुरीचे मोफत वाटप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भोपाळ : ‘बेटी है तो कल है’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त करीत भोपाळमधील पाणीपुरी विक्रेत्याने मुलीच्या जन्मानंतर पाणीपुरीचे मोफत वाटप केले.

अंचल गुप्ता असे त्याचे नाव आहे. कोलार परिसरात त्याने रविवारी दुपारी पाचहून जास्त सहाय्यक नेमून जंगी पार्टी दिली. सुमारे ३५ ते ४० हजार रुपयांची पाणीपुरी मोफत वाटल्याची माहिती देऊन तो म्हणाला की, ‘मुलगा आणि मुलीत भेद करू नका असा संदेशही मी चटकदार पाणीपुरीबरोबरच दिला.’ अंचल ३० वर्षांचा आहे.

त्याने आठवीत शाळा सोडली. तो म्हणाला की, लग्न झाल्यापासून मला मुलगी हवी होती, पण दोन वर्षांपूर्वी पहिला मुलगा झाला. १७ ऑगस्टला मला कन्यारत्न झाले. काल मुलाचा दुसरा वाढदिवसही होता. त्यामुळे मुलीच्या आगमनाची घोषणा अशी करायचे ठरविले. मुलगी झाल्याच्या आनंदासमोर किती रुपयांचा माल मोफत दिला याची मला चिंता नाही.

हेही वाचा: वैवाहिक नात्यात जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवणे बेकायदेशीर नाही - मुंबई सत्र न्यायालय

कोरोना नियम मात्र धाब्यावर

अंचलने दुपारी स्टॉल उघडून मोफत पाणीपुरी देण्यास सुरवात केली. त्यानंतर बरीच गर्दी झाली. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियम धाब्यावर बसविले गेले. संध्याकाळपर्यंत कित्येकांनी मोफत आस्वाद घेतला आणि अंचलचे अभिनंदन केले.

पत्नी पदवीधर

अंचलची पत्नी पदवीधर आहे. तिच्यासाठी तो शिलाई केंद्र सुरु करणार आहे. मुलीच्या जन्मामुळे ही योजना थोडी लांबणीवर पडली असली तरी ती आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावी म्हणून एकेदिवशी शिवणकाम-भरतकामाचे केंद्र सुरु करू असेही अंचलने नमूद केले.

loading image
go to top