Free Scooty Scheme for Girl Students in UP :
esakal
उत्तर प्रदेश सरकारकडून गुणवंत विद्यार्थिनींना मोफत दुचाकी मिळणार आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेवर योगी आदित्यनाथ सरकार काम करत आहे. या योजनेला 'राणी लक्ष्मीबाई योजना' असे नाव देण्यात आले आहे. राज्यातील मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेमुळे महाविद्यालयात ये-जा करताना विद्यार्थिनींना मदत होणार असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.