ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मोफत टॅब; या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

mamta banerjee
mamta banerjee

कोलकता - सरकारी व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ, अल्प दरात कोरोनाची ‘आरसी-पीसीआर’ चाचणी असे निर्णय मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी (ता. ३) घेतले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पश्‍चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. त्याचाचा एक भाग म्हणून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हे निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात येत आहे. पण अनेक विद्यार्थी या शिक्षणाला मुकत आहे. म्हणूनच सरकारी व अनुदानित शाळा व मदरशामध्ये बारावीत शिकणाऱ्या सुमारे साडेनऊ लाख विद्यार्थ्यांना मोफत टॅब देण्यात येणार आहेत. ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या माध्यमिक गटातील सर्व विद्यार्थ्यांना संगणकही पुरविले जातील, अशी माहिती ममता बॅनर्जी यांनी दिली. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com