शंका, मतभेद, प्रतिकाराच्या अभिव्यक्तीमुळे लोकशाहीचे रक्षण: मुखर्जी

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

त्रिवेंद्रम (केरळ) : शंका, मतभेद आणि प्रतिकार करण्याची अभिव्यक्ती हे लोकशाहीच्या रक्षणातील महत्त्वाचे स्तंभ असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले आहे.

इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलताना मुखर्जी म्हणाले, "सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक आणि धार्मिक विविधता ही राष्ट्राची शक्ती आहे. आपल्याकडे वाद-प्रतिवादाची परंपरा आहे. भारतीय हे "असहिष्णु' भारतीय नाहीत.' पुढे बोलताना ते म्हणले की, "अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याचे  इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे कार्य कौतुकास्पद आहे. इतिहासाच्या वस्तूनिष्ठ अभ्यासासाठी इतिहासतज्ज्ञांनी सावध राहावे', असा सल्लाही त्यांनी दिला.

काय आहे इंडियन हिस्ट्री काँग्रेस?
भारतीय इतिहासतज्ज्ञांची इंडियन हिस्ट्री काँग्रेस ही भारतातील सर्वांत मोठी संघटना आहे. 1935 साली स्थापन झालेल्या या संघटनेचे दहा हजारहून अधिक सदस्य आहेत.

Web Title: Freedom of doubt, disagree part of democracy : President