धर्मस्वातंत्र्य महत्वाचा हक्क : निक्की हॅली

वृत्तसंस्था
बुधवार, 27 जून 2018

संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या राजदूत असलेल्या हॅली या भारत भेटीवर आलेल्या पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत. धार्मिक स्वातंत्र्य हा एक महत्वाचा भाग बनला असून, हा एक स्वतंत्र हक्क बनला आहे. भारतात आल्याने माझे मन आनंदित झाले. हे एक खूप सुंदर आहे.

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या राजदूत निक्की हॅली सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. इंडो-अमेरिका या दोन्ही देशांमध्ये विविध स्तरासह आज (बुधवार) चर्चा करण्यात आली. सर्वात दोन जुन्या लोकशाही असलेल्या देशांच्या मैत्रीसंबंधाच्या दृष्टीने ही भेट महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच देशातील प्रत्येकाला आपआपला धर्म निवडण्याचा हक्क असून, धर्मस्वातंत्र्य हा प्रत्येकाचा महत्वाचा हक्क आहे, असेही त्या म्हणाल्या.

संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या राजदूत असलेल्या हॅली या भारत भेटीवर आलेल्या पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत. धार्मिक स्वातंत्र्य हा एक महत्वाचा भाग बनला असून, हा एक स्वतंत्र हक्क बनला आहे. भारतात आल्याने माझे मन आनंदित झाले. हे एक खूप सुंदर आहे. भारत हा उष्ण देश असल्याने लहानपणी मी येथे येण्यास उत्सुक होते, असे माझे पालक सांगत होते. भारत आणि अमेरिका हे दोन देश सर्वात जुनी लोकशाही असणारे देश आहेत. 

त्या पुढे म्हणाल्या, भारत आणि अमेरिकेने अधिकाधिक कारणांसाठी जवळ यायला हवे. आम्हाला असे वाटते, की धर्मस्वातंत्र्य हे आपल्या स्वातंत्र्याचा हक्क बनला आहे. 

दरम्यान, या दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये हॅली भारतीय वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक नेते आणि विद्यार्थी यांच्याशी मैत्रीसाठी भेट घेणार आहेत. 

Web Title: Freedom of religion is as important as rights says Nikki Haley on India visit