फ्रान्सची पुन्हा एकदा मोठी कारवाई, अलकायदाच्या कमांडरसह डझनभर दहशतवाद्यांचा खात्मा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 November 2020

पैगंबर मोहम्मद यांच्यावरील व्यंगचित्रामुळे फ्रान्समध्ये अनेक हिंसक घटना घडल्या. 16 ऑक्टोबर रोजी एका शिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आला होता.

पॅरिस- फ्रान्सने पुन्हा एकदा दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. माली येथे सुमारे डझनभर दहशतवाद्यांना यमसदनी धाडल्याचा दावा फ्रान्सच्या लष्कराने केला आहे. या दहशतवाद्यांमध्ये अलकायदाचा जिहादी कमांडरही होता, असे सांगण्यात येते. लष्करी हेलिकॉप्टरने माली येथे अलकायदाशी निगडीत एका जिहादी कमांडरचा खात्मा केल्याची घोषणा फ्रान्सच्या सैन्यदलाने केली आहे. 

मंगळवारी सुरु झालेल्या या ऑपरेशनमध्ये आरव्हीआयएम नावाच्या एका दहशतवादी संघटनेचा बाह-अल-मुसाला मारण्यात आले. मुसाचा संयुक्त राष्ट्रांच्या यादीत समावेश होता. त्याचा अनेक दहशतवादी हल्ल्यांत हात असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे दोन आठवड्यांपूर्वी फ्रान्सने एअर स्ट्राईक करत 50 हून अधिक दहशतवाद्यांना मारले होते. 

हेही वाचा- असीम धैर्य दाखवणाऱ्या जवानांसाठी एक दिवा लावा; दिवाळीच्या मोदींनी दिल्या सदिच्छा

दरम्यान, पैगंबर मोहम्मद यांच्यावरील व्यंगचित्रामुळे फ्रान्समध्ये अनेक हिंसक घटना घडल्या. 16 ऑक्टोबर रोजी एका शिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा ट्यूनेशिया येथील एका व्यक्तीने बेसिलिकामध्ये तीन जणांची हत्या केली होती. 

हेही वाचा- राहुल गांधी हे गोंधळलेले नेते

तीन दिवसांनंतर ल्योन शहरात एका चर्च बाहेर गोळीबार झाला होता. ही घटना व्हिएन्ना येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी जोडण्यात आली होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: French Army claims killed many terrorists in mali