
रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या आणि सलाइन लावलेल्या मित्राला बाइक राइडला नेल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला लाजवेल असं हे दृश्य आहे. या व्हायरल व्हिडीओवर उलट सुलट प्रतिक्रिया आता येत आहेत. काहींनी मित्रासाठी कायपण असं म्हटलंय. तर काहींनी मित्राच्या तब्येतीसाठी हे धोक्याचं असल्याचं म्हटलंय. ग्वाल्हेरमधला हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे.