Friendship Dayच्या द्या हटके शुभेच्छा, पहा एकापेक्षा एक भारी मेसेज

खरं तर फ्रेंडशिप डे हा लोकांमध्ये मैत्री आणि सहकार्याच्या भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी एक उत्तम दिवस आहे.
Friendship Day
Friendship Daysakal
Updated on

भारतामध्ये ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार हा फ्रेंडशीप डे (Friendship Day) म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. या फ्रेंडशिप डे विषयी तरुणाईमध्ये भरपूर उत्साह दिसून येतो. शाळा, कॉलेज मध्ये एकमेकांना फ्रेंडशीप बॅन्ड बांधून हा दिवस साजरा करण्याची आपल्या देशात अनोखी पद्धत आहे.

खरं तर फ्रेंडशिप डे हा लोकांमध्ये मैत्री आणि सहकार्याच्या भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी एक उत्तम दिवस आहे. माणसाच्या आयुष्यात मैत्रीला खुप अभुतपुर्णस्थान आहे आणि या गोष्टीची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. (friendship day best wishes)

Friendship Day
Friendship Day: तुमच्याही आयुष्यात आहे का करीना कपूर आणि अमृता अरोरासारखी मैत्री?

हल्ली सोशल मीडीयाच्या या काळात प्रत्येकजण Facebook Messages, WhatsApp Status, Images, Greetings याद्वारे या मैत्री दिनाच्या शुभेच्छा शेअर करत असतात. तुम्हाला जर या मैत्री दिवसानिमित्त तुमच्या मित्र मैत्रीणींना हटके शुभेच्छा द्यायच्या असेल तर खालील शुभेच्छा लिस्ट चेक करा.

Friendship Day
Friendship Day 2022: Friends ला द्या अनोखी भेट, पहा एकापेक्षा एक भारी गिफ्टची लिस्ट

१. मैत्री हसवणारी असावी

मैत्री चिडवणारी असावी

प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी

एक वेळेस ती भांडणारी असावी

पण कधीच बदलणारी नसावी

मैत्री दिनाच्या शुभेच्छा !

२. प्रेमाच्या चौकात कितीपण फिरा मित्रांच्या कट्यांवर येणारी मज्जा काही औरच असते.

मैत्री दिवस शुभेच्छा.

Friendship Day
तुमचा जोडीदार तुमचा Best Friend आहे का, कसे ओळखाल?

३. रक्ताची नसूनही रक्तात भिणते ती मैत्री….

मैत्री दिनाच्या शुभेच्छा!!!

४. मैत्री म्हणजे थोडं घेणं

मैत्री म्हणजे खूप देणं

मैत्री म्हणजे देता देता

समोरच्याच होऊन जाणं..

मैत्री दिनाच्या शुभेच्छा..

५. मित्र नेहमी अंलकाराप्रमाणे केवळ सौंदर्य वाढविणारे नसावेत,

स्तुती करणारे मित्र आपल्याला अनेक मिळतील,

पण आरश्याप्रमाणे आपले गुणदोष दाखविणारे मित्र,

दैवानेच लाभतात…

मैत्री दिनाच्या शुभेच्छा

६. शब्दांपेक्षा सोबतीत जास्त सामर्थ्य असतं,

मैत्रीचे खरे समाधान खांद्यावरच्या हातात असतं.

मैत्री दिनाच्या शुभेच्छा!!!

Friendship Day
FRIENDS Reunion : अवघ्या सात तासांत मिळाले तब्बल इतके व्ह्यूज

७. गुलाबाचे फुल उमलू दे जीवनाच्या मार्गात

तुमच्या चेहऱ्यावर हास्य कामय राहू दे

तुमच्या चरणावर येऊ दे आनंदाची लाट,

तुमच्यासाठी हीच प्रार्थना कायम माझ्या हृदयात..

मैत्री दिनाच्या शुभेच्छा !

८. दुनियादारीमध्ये आम्ही थोडे कच्चे आहोत,

पण दोस्तीमध्ये एकदम सच्चे आहोत

आमचे सत्य फक्त यावरच कायम आहे की

आमचे मित्र आमच्यापेक्षाही खूप चांगले आहेत !!!

मैत्री दिनाच्या शुभेच्छा !

Friendship Day
Friendship Day: आजही का भगवान श्री कृष्ण आणि सुदामाची मैत्री अजरामर आहे?

९. मैत्रीपेक्षा अधिक मौल्यवान कोणतीही संपत्ती नाही,

मैत्रीपेक्षा चांगली कोणतीही प्रतिमा नाही,

मैत्री ही कच्च्या धाग्यासारखी आहे,

पण या धाग्यापेक्षा मजबूत कोणतीही साखळी

या जगात नाही!

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

१०. लोक रूप पाहतात, आम्ही हृदय पाहतो…

लोक स्वप्न पाहतात, आम्ही वास्तव पाहतो…

लोक जगात मित्र पाहतात, आम्ही मित्रांमध्ये जग पाहतो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com