FRIENDS Reunion : अवघ्या सात तासांत मिळाले तब्बल इतके व्ह्यूज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Friends The Reunion

FRIENDS Reunion : अवघ्या सात तासांत मिळाले तब्बल इतके व्ह्यूज

जगभरात सर्वाधिक गाजलेली मालिका 'फ्रेंड्स' FRIENDS एका नव्या रुपात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली. 'फ्रेंड्स : द रियुनियन' FRIENDS The Reunion हा विशेष भाग २७ मे रोजी प्रदर्शित झाला. भारतात Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा भाग गुरुवारी दुपारी प्रदर्शित झाला. गेल्या अनेक महिन्यांपासून या भागाची प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून उत्सुकता आणखी ताणली गेली होती. जवळपास १७ वर्षांनंतर मालिकेतील सर्व कलाकार पुन्हा एकदा एकाच मंचावर आले होते. त्यामुळे या बहुचर्चित एपिसोडला ओटीटी प्लॅटफॉर्मवरही खूप चांगले व्ह्यूज मिळाले. (FRIENDS Reunion records over 1 million views in less than seven hours on Zee5)

'या सीरिजला अवघ्या सात तासांच्या आत जवळपास एक दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत', अशी माहिती ZEE चे डिजिटल बिझनेस अँड प्लॅटफॉर्म्सचे अध्यक्ष अमित गोएंका यांनी दिली. या विशेष भागात, कलाकारांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला, काही डायलॉग्स म्हणून दाखवले आणि पडद्यामागच्या काही रंजक गोष्टीही सांगितल्या.

हेही वाचा: Indian Idol 12: टीमचा मोठा निर्णय; सर्व स्पर्धकांची घरवापसी

या अमेरिकन सिटकॉममध्ये जेनिफर अॅनिस्टन, मॅट लेब्लांक, डेविड श्विमर, कोर्टनी कोक्स, लिसा कुड्रो आणि मॅथ्यू पेरी यांच्या मुख्य भूमिका आहेत. 'फ्रेंड : द रियुनियन' या विशेष भागासाठी हे सर्व कलाकार १७ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले होते. हा भाग २०२० मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनामुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

Web Title: Friends Reunion Records Over 1 Million Views In Less Than Seven Hours On

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :zee5
go to top