Friendship Day: तुमच्याही आयुष्यात आहे का करीना कपूर आणि अमृता अरोरासारखी मैत्री ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Friendship Day: Friendship of kareena kapoor and Amruta Aroda

Friendship Day: तुमच्याही आयुष्यात आहे का करीना कपूर आणि अमृता अरोरासारखी मैत्री ?

Friendship Day: करीना आणि अमृताची मैत्री किती घट्ट आहे हे सगळ्यांनाच माहितीये. मित्र मैत्रीणी प्रत्येकाच्याच आयुष्यातच असतात. मात्र फ्रेंडशिप डे च्या दिवशी दूरच्या आणि जवळच्या सर्व मित्रमंडळींची आपण आवर्जून आठवण करतो. अनेकदा आपलं अनेक कारणांनी आपल्या जवळच्या मित्र मैत्रीणींशी खटकतंही. मात्र करीना आणि अमृताचं मैत्रीचं नात दीर्घकाळापासून टीकत आलंय. दोघींत असलेलं मैत्रीपूर्वक प्रेम बघून आजही त्यांच्या मैत्रीचं बी टाऊनमध्ये कौतुक केल्या जातं.

करीना कपूर ही एक बोल्ड आणि उघडपणे आपलं मत मांडणारी अभिनेत्री आहे. करीनाच्या या स्वभावाने आपण सगळेच परिचीत असालच. करीनासारखा तडक फडक स्वभाव असणाऱ्या व्यक्तिमत्वाची जुळवून घेणं प्रत्येकालाच जमत नाही. मात्र अमृता करीनाची तेव्हापासून मैत्रीण आहे जेव्हा करीनाची अभिनेत्री म्हणून जगाला ओळख नव्हती. अमृता करीनाची बेस्ट फ्रेंड म्हणजेच जीवलग मैत्रीण आहे. मात्र या दोघींमध्ये अशी कुठली खास गोष्ट आहे जी या दोघींची मैत्री कायम जोडून ठेवते ? अशी मैत्री आपल्या प्रत्येकाच्याच जीवनात असायला हवी.

अनेकांच्या आयुष्यात मित्र येतात आणि जातात. मात्र फार कमी मित्र आयुष्यभर सोबत असतात. अनेकजण मैत्रीचा फायदा घेणारेही असतात. मात्र अमृताची मैत्री फार वेगळी आहे.

लोक काय म्हणतात लक्ष देऊ नका

जेव्हा एखादा मित्र आपल्यापेक्षा पुढे जातो तेव्हा अनेकांकडून त्याच्याविरोधात भडकवण्याचा प्रयत्न होत असतो. मात्र करीनाच्या सक्सेसमुळे लोकांचं ऐकून अमृता आणि करीनाच्या मैत्रीवर त्याचा कधीही परिणाम झाला नाही.

करीना आज एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे तर अमृता प्रसिद्धीझोतात करीनाच्या मागे आहे. तरीही अमृताने कधीही करिनाचा हेवा केला नाही. याउलट अमृता नेहमीच करीनाच्या फॅशन आणि यशस्वीतेची प्रशंसा करते.

जीवनाच्या चांगल्या वाईट वेळेत साथ सोडत नाहीत

प्रोफेशनच्या समस्या असेल किंवा पर्सनल लाईफच्या, अमृतासारखी मैत्रीण असेल तर करीनाला आणखी कोणी नकोच असेल. अमृताने कायम करीनाची साथ दिली आहे. तसेच तिला अनेकदा तिने चांगले सल्ले देखील दिले आहेत.

मैत्री आणि ईमानदारी जपणाऱ्या मैत्रीणी

करीना एकदा तिच्या मुलाखतीत सांगितले होते की, 'जर अमृताला करीनाची कुठली गोष्ट खटकली तर ती लगेच तिला त्याचवेळी सांगते. (Bollywood) करीनाला अमृताची ही सवय फार आवडते. आपल्या वाईट सवईंवर आपल्याला लगेच टोकणारा मित्र असेल तर तुमचं आयुष्य खरंच सुखकर होऊ शकतं', असंही करीना म्हणाली होती. करीनाची जीवलग मैत्रीण अमृतासारखी मैत्री तुमच्याही आयुष्यात असायला हवी.

Web Title: Kareena Kapoor And Amrita Arora Friendship Bond Is Famous Know Her Friendship Goal And Chemistry Of Their Friendship

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..