क्लार्क ते मुख्यमंत्री, येडियुरप्पा म्हणजे राखेतून भरारी घेणारा फिनिक्स पक्षी

येडियुरप्पा ज्या तांदूळ कारखान्यात नोकरी करत होते, त्याच कारखान्याच्या मालकाच्या मुलीशी ५ मार्च १९६७ रोजी लग्न केले.
B S Yediyurappa
B S Yediyurappaesakal
Updated on

नवी दिल्ली: मागच्या एक-दोन महिन्यांपासून सुरु असलेली चर्चा अखेर खरी ठरली आहे. बी.एस. येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी सोमवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. येडियुरप्पा हे कर्नाटकात सर्वात प्रभावशाली असलेल्या लिंगायत समाजातून (lingayat community) येतात. त्यांना पुन्हा एकदा पाचवर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाहीय. येडियुरप्पा यांचा राजकारणातील मुख्यमंत्रीपदाचा प्रवास सहज-सोपा नाहीय. समाज कल्याण खात्यात (social welfare dept) एक साधा कारकून म्हणून (Clerk) त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली होती. (From a Clerk to Ktaka CM BS Yediyurappa Has Been BJPs Phoenix Rising From Ashes dmp82)

संघाच्या शाखेतून त्यांच्या विचारांची जडण-घडण होत गेली. वयाच्या १५ व्या वर्षापासून येडियुरप्पा संघाच्या शाखेवर जाऊ लागले. जनसंघातून त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. शिवमोगा जिल्ह्यातील शिकारीपुरा हा त्यांचा मतदारसंघ. ७० च्या दशकात जनसंघाचे शिकारीपुरा तालुक प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. शिकारीपुरा मतदारसंघातून येडियुरप्पा यांनी आतापर्यंत आठवेळा विधानसभेची निवडणूक जिंकली आहे. दांडगा जनसंर्पक आणि मतदारसंघाचा केलेला विकास यामुळे येडियुरप्पा यांना हे शक्य झाले.

B S Yediyurappa
Railway Survey: 'पार्शल एसी लोकल'ला प्रवाशांची पसंती, जाणून घ्या सविस्तर

येडियुरप्पा यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीमध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या भूषवल्या आहेत. कर्नाटक भाजपा प्रदेशाध्यक्षपासून ते विरोधी पक्ष नेता, विधान परिषद सदस्य या पदांवर ते राहिले आहेत. कला शाखेतून पदवी मिळवणाऱ्या येडियुरप्पा यांनी आणीबाणीच्यावेळी तुरुंगवासही भोगला आहे. समाज कल्याण खात्यात क्लार्क म्हणून काम करणारे येडियुरप्पा यांनी शिकारीपुरामध्ये एका तांदूळ कारखान्यातही क्लार्क म्हणून नोकरी केली आहे. शिवमोगामध्ये त्यांनी एक हार्डवेअरचे दुकानही सुरु केले होते.

येडियुरप्पा ज्या तांदूळ कारखान्यात नोकरी करत होते, त्याच कारखान्याच्या मालकाची मुलगी मैत्रादेवी हिच्याबरोबर ५ मार्च १९६७ रोजी लग्न केले. येडियुरप्पा यांना दोन मुलं आणि तीन मुली आहेत. २००४ कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. पण त्यावेळी काँग्रेस आणि जेडीएसने एकत्र येऊन सरकार स्थापन केले. त्यामुळे येडियुरप्पांची मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली.२००६ मध्ये येडियुरप्पा यांनी देवेगौडा यांचा मुलगा कुमारस्वामी बरोबर हातमिळवणी करुन, धर्म सिंह यांचे सरकार पाडले.

B S Yediyurappa
वाचनाची आवड आहे? मग मुंबईतील 'या' बूक कॅफेला नक्की भेट द्या

आलटून-पालटून मुख्यमंत्री होण्याच्या फॉर्म्युलानुसार, कुमारस्वामी मुख्यमंत्री बनले, येडियुरप्पा उपमुख्यमंत्री झाले. नोव्हेंबर २००७ मध्ये येडियुरप्पा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. पण सातच दिवस त्यांचे मुख्यमंत्रीपद टिकले. कुमारस्वामी यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेत आघाडी मोडली. २००८ मध्ये येडियुरप्पांच्या नेतृत्वाखाली पक्षाने विजय मिळवला आणि दक्षिण भारतात पहिल्यांदा स्वबळावर भाजपाचे सरकार आले. त्यानंतर वेगवेगळ्या वादांमध्ये येडियुरप्पा यांचे नाव आले.

सत्तेचा गैरवापर करुन, जमीन वाटपात मुलासाठी अनुकूल भूमिका घेतल्याचा त्यांच्यावर आरोप झाला. बेकायद खाणकाम घोटाळ्यात लोकायुक्तांनी ताशेरे ओढले. त्यामुळे ३१ जुलै २०११ रोजी त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर येडियुरप्पा यांचे पक्षाबरोबर मतभेद झाले. अनेक दशकापासूनचे भाजपा बरोबर असलेले नाते त्यांनी तोडले व कर्नाटक जनता पक्षाची स्थापना केली. त्यांना आपल्या केजेपी पक्षाला राज्याच्या राजकारणात ओळख मिळवून देता आली नाही.

पण १० टक्के मते घेऊन त्यांनी २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला जोरदार झटका दिला. येडियुरप्पा यांच्या पक्षाचे फक्त सहा आमदार निवडून आले होते. त्यानंतर २०१४ लोकसभा निवडणुकीच्याआधी येडियुरप्पा यांचा कर्नाटक जनता पक्ष भाजपामध्ये विलीन झाला. २६ ऑक्टोंबर २०१६ मध्ये त्यांना मोठा दिलासा मिळाला. ४० कोटीच्या बेकायद खाणकाम घोटाळ्यातून सीबीआय कोर्टाने येडियुरप्पा, त्यांची दोन मुलं आणि जावयाची निर्दोष मुक्ततता केली. त्यामुळेच त्यांना २०११ मध्ये मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले होते.

२०१८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने त्यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले. जनतेने त्रिशंकु कौल दिला. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. पण त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत नव्हते. राज्यपालांनी त्यांना सर्वात मोठा पक्ष म्हणून सरकार बनवण्याची संधी दिली. पण विश्वासदर्शक ठरावाच्या आधी तीन दिवसात हे सरकार कोसळले. त्यानंतर काँग्रेस-जेडीएसने एकत्र येऊन सरकार बनवले. पण हे सरकार फार काळ टिकले नाही. भाजपाने आमदार फोडून पुन्हा सरकार स्थापन केले. येडियुरप्पा मुख्यमंत्री झाले. पण दोनवर्ष पूर्ण होत असताना, त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com