From Crime to Spice: इंदूरच्या मध्यवर्ती तुरुंगात कैद्यांकडून मसाले तयार करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा उद्योग त्यांच्या पुनर्वसनाचा मार्ग ठरत आहे.
इंदूर : राजधानी नवी दिल्लीतील तिहार तुुरुंगाच्या धर्तीवर इंदूरच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होत आहे. कधीकाळी गुन्हा करणारे हात आता मसाले तयार करण्याच्या कामात गुंतले आहेत.